'तो' मनोरुग्ण नुकसान करतो म्हणून क्रूरपणे जीव घेतला

08 Feb 2026 12:23:37
कोल्हापूर.
suspicious death Kolhapur कोल्हापूर जिल्ह्यातील लकीकट्टे गावात एका वयस्कर व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नेसरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या शवविच्छेदन अहवालात अद्याप मृत्यूचं नेमकं कारण प्रलंबित ठेवण्यात आलं आहे.
 

suspicious death Kolhapur  
स्थानिकांनी आणि suspicious death Kolhapur पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची मानसिक स्थिती काही काळापासून स्थिर नव्हती. गेल्या काही दिवसांत त्यांनी गावातील गवतांच्या गंजींना आग लावल्याची घटना घडवली होती, ज्यामुळे गावकऱ्यांना मोठं नुकसान आणि काहींना जीवालाही धोका निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी त्या व्यक्तीला मारहाण केली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.3 फेब्रुवारी रोजी लकिकट्टे गावाशेजारी या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सांगितले की, दोन ते तीन दिवस माळरानावर जेवण आणि पाणी न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तथापि, अमानुष मारहाणीमुळे मृत्यू झाला का, याबाबत साक्षीदार नसल्यामुळे कोणतेही ठोस पुरावे सध्या समोर आलेले नाहीत.
 
 
पोलिस अधिक तपास suspicious death Kolhapur करत आहेत आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती नेसरी पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी दिली आहे.या घटनेमुळे गावात आणि परिसरात चिंता आणि धक्कादायक चर्चा सुरू आहे, तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे प्रकरणाची तीव्रता अधिक वाढली आहे.
Powered By Sangraha 9.0