बुरखा घालून महिलांच्या डब्यात घुसून 'अश्लील स्पर्श'

चालत्या ट्रेनमधून मारली उडी

    दिनांक :08-Feb-2026
Total Views |
मुंबई,
women compartment at Ghatkopar station मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न एकदा पुनः चव्हाट्यावर आला आहे. घाटकोपर स्थानकाजवळ घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, एका पुरुषाने बुरखा घालून महिलांच्या डब्यात घुसून त्यांना अश्लील स्पर्श केला. या प्रकारामुळे रेल्वे पोलिसांवर आणि त्याच्या गस्तीत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
 

women compartment at Ghatkopar station 
सुरुवातीला बुरखा घातलेल्या या व्यक्तीला कोणत्याही प्रवाशाच्या लक्षात आले नाही. मात्र, त्या व्यक्तीच्या अश्लील हालचालींमुळे काही महिलांना संशय आला आणि त्यांनी त्याला जाब विचारला. या घटनेचा एक व्हिडिओ एका प्रवाशाने कॅप्चर केला, जो लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिलांनी त्या बुरखाधारी व्यक्तीला जाब विचारत त्याच्या कृत्याचा निषेध केला. त्यातच आरोपीला पकडले जाण्याची भीती वाटली आणि त्याने चालत्या ट्रेनमधून उडी घेतली आणि घाटकोपर स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर उडी मारून निघून गेला.
 
 
अशा प्रकारे एकही महिला women compartment at Ghatkopar station प्रवाशी सुरक्षित नाही का? हे प्रश्न रेल्वे प्रशासनाला तिखटपणे विचारले जात आहेत. यामुळे मध्य रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत अधिक कठोर उपाययोजना घेण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे. या घटनेची माहिती मिळताच, रेल्वे पोलिसांनी (GRP/RPF) तातडीने मुलुंड आणि ठाणे स्थानकांवर तपास सुरू केला. मात्र, तोपर्यंत आरोपी पसार झाला होता.संबंधित आरोपीने रेल्वे पोलिसांना कंठी पडले असले तरी त्याचे नाव, रूप, आणि शिनाखत अद्याप उघडकीस आलेली नाही. घाटकोपर आरपीएफने या घटनेबद्दल रेल्वे कायद्याच्या कलम 162 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. महिला प्रवाशांच्या कडून घटनांनंतर संताप व्यक्त केला जात आहे. त्यांचा आरोप आहे की, अशा घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या गस्तीत आणि सुरक्षा व्यवस्थेत अधिक गंभीरता दाखवली पाहिजे.दरम्यान, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांकडून गस्तीच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. तथापि, या घटनेने प्रवाशांमध्ये एक गंभीर चिंता निर्माण केली आहे, ज्या अंतर्गत महिला सुरक्षिततेसाठी आणखी प्रभावी उपाययोजना अपेक्षित आहेत.सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाने कोणते पाऊले उचलणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.