22 वर्षांनंतर शाहरुख खानच्या ‘मैं हूं ना’चा सिक्वेल येणार?

08 Feb 2026 12:05:54
मुंबई,
Main Hoon Na sequel बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. वर्षाच्या अखेरीस शाहरुख सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित बहुप्रतिक्षित अॅक्शन-थ्रिलर चित्रपट “किंग”मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानंतर शाहरुख कोणत्या नव्या प्रोजेक्टवर काम करणार, याबाबत बराच काळ सस्पेन्स निर्माण झाला होता. त्यातच २००४ साली प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या चित्रपट “मैं हूं ना”च्या सिक्वेलच्या चर्चांनी चाहत्यांच्या अपेक्षा अधिकच वाढवल्या होत्या.
 
 

Shah Rukh Khan, Main Hoon Na sequel, 
“मैं हूं ना”मध्ये शाहरुख खानने साकारलेली मेजर राम प्रसाद शर्मा ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. देशभक्ती, अॅक्शन, रोमॅन्स आणि विनोद यांचा सुरेख मिलाफ असलेला हा चित्रपट शाहरुखच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला होता. तब्बल २२ वर्षांनंतर या चित्रपटाच्या सिक्वेलद्वारे त्याच जगात शाहरुख परतणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे, “मैं हूं ना २”मध्ये शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याचे वृत्तही समोर आले होते.
 
 
काही दिवसांपूर्वी फराह खान “मैं हूं ना”चा सिक्वेल बनवत असल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर पसरल्या होत्या. पटकथा अंतिम करण्यात आली असून, मूळ कलाकारांना पुन्हा एकदा एकत्र आणण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. “मैं हूं ना”मधील गाणी, संवाद आणि कथा आजही लोकप्रिय असल्याने सिक्वेलबाबत प्रेक्षकांच्या अपेक्षा स्वाभाविकपणे उंचावल्या होत्या.
 
 
मात्र आता या सर्व चर्चांवर दिग्दर्शक-नृत्यदिग्दर्शिका Main Hoon Na sequel फराह खानने स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. फराह खानने स्पष्ट केले की “मैं हूं ना २” संदर्भातील सर्व बातम्या अफवा आहेत. या वृत्तांवर विश्वास ठेवू नये, असे तिने सांगितले. सध्या “मैं हूं ना”च्या सिक्वेलवर कोणतेही काम सुरू नसल्याचे तिने ठामपणे स्पष्ट केले आहे.फराह खानने पुढे सांगितले की तिला कोणत्याही चित्रपटाच्या सिक्वेलची घाई नाही आणि सध्या ती नवीन चित्रपट दिग्दर्शित करण्याच्या मनःस्थितीतही नाही. तिच्या या खुलाशामुळे “मैं हूं ना २” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार या आशेवर पाणी फिरले आहे.दरम्यान, शाहरुख खानचे चाहते आता त्याच्या आगामी “किंग” या चित्रपटाकडे उत्सुकतेने पाहत आहेत. “मैं हूं ना २” सध्या तरी केवळ चर्चेपुरतेच मर्यादित राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून, या विषयावर पडदा पडल्याने चाहत्यांची काहीशी निराशा झाली आहे.
Powered By Sangraha 9.0