अमरावती विभागात १ लाख ५७ हजार परीक्षार्थी

    दिनांक :09-Feb-2026
Total Views |
आजपासून बारावीची परीक्षा
शिक्षण मंडळाची तयारी पूर्ण
अमरावती,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी इयत्ता Amravati: 12th exam १२ वीची परीक्षा मंगळवार १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. अमरावती विभागातल्या ५ जिल्ह्यातील एकूण १ लाख ५७ हजार २६७ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे.
 
 
examds,ds.
 
Amravati: 12th exam शिक्षण मंडळाने परीक्षेची पूर्ण तयारी केली आहे. अकोला जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेसाठी २७ हजार ३५ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहे. ८७ केंद्रांवर त्यांची परीक्षा होणार असून त्यातले २२ केंद्र उपद्रवी आहे. अमरावती जिल्ह्यातून ३५ हजार ९२९ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. त्यासाठी १३७ परीक्षा केंद्र आहे. त्यातील ४३ उपद्रवी आहेत. बुलढाणा जिल्ह्यातून ३६ हजार ३६४ विद्यार्थी परीक्षेला बसणार असून ११७ परीक्षा केंद्र त्यांच्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्यातले १५ केंद्र उपद्रवी आहे. यवतमाळ जिल्ह्यातून ३५ हजार ५७० विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे. ते १२८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देतील, त्यातील २० केंद्र हे उपद्रवी आहेत. वाशीम जिल्ह्यातील २२ हजार ३६९ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले आहे. त्यांच्यासाठी ७४ परीक्षा केंद्र गठीत करण्यात आली असून त्यातील २८ केंद्र उपद्रवी घोषीत करण्यात आली आहे. असे एकूण १ लाख ५७ हजार २६७ परीक्षार्थी असून ५४३ परीक्षा केंद्र आहे. त्यातील १३० उपद्रवी आहेत.
 
 
Amravati: 12th exam पाचही जिल्ह्यासाठी एकूण ७३ परीक्षक नियुक्त करण्यात आले आहे. कॉपीमुक्त अभियानाची काटेकोर अंमलबावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समिती बारकाईन लक्ष ठेवणार आहे. उपद्रवी केंद्रांवर विशेष लक्ष ठेवल्या जाणार आहे. १८ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे.