बिग बॉस मराठी सिझन ६ मध्ये राखी सावंतची धम्माल एंट्री!

09 Feb 2026 11:38:34
मुंबई,
Bigg Boss Marathi 6 "ड्रामा, धक्का आणि धमाका!" हे शब्द पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर अनुभवायला मिळणार आहेत. कारण बिग बॉस मराठी सिझन ६ मध्ये घरात प्रवेश करत आहे एक जबरदस्त वाइल्ड कार्ड स्पर्धक, आणि ती आहे राखी सावंत! बिग बॉसच्या घरात राखीच्या एंट्रीमुळे आता एंटरटेनमेंटची लहर आणखी मोठी होणार आहे.
 

Bigg Boss Marathi 6, Rakhi Sawant, wild card entry, 
राखी सावंतला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आणि आता अखेर हा क्षण आला आहे. राखीच्या आगमनामुळे घरातल्या समीकरणांवर आणि स्पर्धकांच्या रणनीतींवर मोठा परिणाम होईल. तिच्या मर्जीवर खेळणारी राखी प्रत्येक सदस्याचा गेम हादरवून टाकते. कोणाशी मित्रता करायची, कोणाशी वाद घालायचा, कोणाला भावनिक गोंजारायचं आणि कोणाच्या नसा दाबायच्या—हे सगळं राखीच्या अनपेक्षित खेळाने निश्चितच रंगणार आहे.
राखी सावंतने आपली Bigg Boss Marathi 6 एंट्री जाहीर करताना, “राखी जाणार आणि गेम पालटणार. माझ्याशिवाय बिग बॉस अधुरं आहे. मी घरात गेल्यावर सगळ्यांचा आवाज गायब होतो. जेव्हा राखी सावंत घरात जाणार तिची मर्जी चालणार आहे. मी घरात धम्माल करणार आहे,” असं म्हटलं आहे. तिच्या या विधानाने शोच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढवली आहे. राखीला आवडते वेगवेगळे कास्ट्यूम, तिचा विशिष्ट गेम आणि त्यातली धम्माल पाहण्याची इच्छा सर्वांनाच आहे.
 
 
राखी पुढे म्हणाली, “रितेश देशमुख Bigg Boss Marathi 6 अमेझिंग आहेत आणि उत्तम अभिनेते आहेत. संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आपला बिग बॉस मराठी चालतो आहे, मला खूप अभिमान आहे ते हा शो होस्ट करत आहेत. आपल्या मराठी लोकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी मी बिग बॉस मराठी करत आहे.”राखी सावंत हिला पाहून घरातील प्रत्येक स्पर्धकाचे धाबे दणाणतील, हे नक्की! राखी ही अशी स्पर्धक आहे जी सर्वच स्पर्धकांना घाबरवते. तिचा निखळ मनोरंजनाचा स्वभाव आणि बेधडक खेळ नेहमीच प्रेक्षकांना चांगला लहान पडतो. राखीची एन्ट्री म्हणजेच बिग बॉसच्या ड्राम्याचं लेव्हल अप! ती कोणत्याही परिस्थितीला चांगल्या प्रकारे हाताळते आणि वेळ आली तर घराचा गेम पूर्णपणे बदलून टाकते.
 
 
अशा तऱ्हेने बिग बॉसच्या Bigg Boss Marathi 6 घरात राखीची एंट्री म्हणजेच खेळाला एक नवीन दिशा मिळवणे. राखीशिवाय बिग बॉसची मजा अधुरीच राहते आणि यावेळी तो खेळ एकदम धमाल होणार आहे.गेल्या काही दिवसांपासून राखी बिग बॉसच्या घरात येणार अशी चर्चा सुरू होती आणि अखेर तो क्षण येऊन ठेपला आहे. राखीच्या एंट्रीला नक्कीच प्रेक्षकांचा डबल डोस मनोरंजन मिळणार आहे. राखी घरात आले की तिथे धमाका होणार हे निश्चित. तिचे वेगळेपण आणि नेहमीच अप्रत्याशित वागणं घरातील सामंजस्य आणि गटबाजीला एक नवीन वळण देणार आहे.आता बघा, घरात राखीच्या आगमनाने बिग बॉस मराठी सिझन ६ ची मजा किती वाढते!
Powered By Sangraha 9.0