भोन हा ऐतिहासिक प्राचीन वारसा त्याचे संरक्षण तातडीने होणे आवश्यक : डॉ. देवतारे

09 Feb 2026 20:42:20
बुलढाणा, 
भोन येथील बौद्ध स्तूप हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर देशातील अत्यंत प्राचीन व Buddhist stupa a valuable heritage मौल्यवान वारसा असून त्याचे संवर्धन आणि संरक्षण तातडीने होणे आवश्यक आहे असे मत प्रा. डॉ. बी. सी. देवतारे यांनी व्यक्त केले. बुलढाणा शहरात समस्त उपासिका संघ व दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
 
 
devtare
 
प्रा. डॉ. देवतारे यांनी सांगितले की, भोन येथील बौद्ध स्तूपाचा इतिहास इसवी सनपूर्व पहिल्या ते तिसर्‍या शतकापर्यंत जातो. सुमारे २,३०० वर्षांपूर्वी या परिसरात एक प्रगत आणि समृद्ध शहर वसलेले होते. त्या काळातील ही सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचे उत्खननातील संशोधनातून सिद्ध झाले आहे. उत्खननात सापडलेली नाणी, स्त्रियांची आभूषणे, बौद्ध धर्माची प्रतीके तसेच इतर ऐतिहासिक अवशेष या शहराच्या वैभवशाली जीवनशैलीची साक्ष देतात. देश-विदेशातील नाण्यांवरून आणि धान्य व्यापाराच्या पुराव्यांवरून हे शहर आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र होते, असेही त्यांनी नमुद केले.
 
 
Buddhist stupa a valuable heritage  भाषणात देवतारे म्हणाले की, २००२ मध्ये पातुर्डा येथे संशोधनास सुरुवात केल्यानंतर पूर्णा नदीच्या खोर्‍यातील भोन परिसरात शेती व पर्यावरणाशी संबंधित उत्खनन करण्यात आले. या संशोधनात सम्राट अशोकांनी उभारलेल्या ८४ हजार स्तुपांपैकी एका स्तुपाचे अवशेष सापडल्याचेही देवतारे यांनी सांगितले. त्या काळात हा भाग भातशेतीसाठी पोषक होता; मात्र आज पर्यावरणीय बदलांमुळे येथे ज्वारीसारखी पिके घेतली जात आहेत.डॉ. देवतारे यांनी पर्यावरणीय बदलामुळे पारंपरिक पीक पध्दतीत झालेल्या बदलांची माहिती दिली. प्रा. डॉ. देवतारे यांच्या ऐतिहासिक संशोधन कार्याची दखल घेत मेजर जनरल सर अलेझांडर कलिंगम यांच नावाने दिला जाणारा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शहरातील विविध सामाजिक संघटनांतर्फे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांनी केले, तर अध्यक्षस्थानी इतिहास संशोधक विलास खरात होते. भोन स्तुपासाठी मंजूर झालेला निधी अद्या खर्च न झाल्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी लेखक-विचारवंत रविंद्र इंगळे चावरेकर, इतिहास संशोधक प्रा. शाम देवकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
Powered By Sangraha 9.0