गझलेची समीक्षा हवी तेवढी झालीच नाही

    दिनांक :09-Feb-2026
Total Views |
कुलगुरू आवलगावकर यांची खंत
अ. भा. मराठी गझल संमेलनाचा समारोप
अमरावती, 
Marathi Ghazal मराठी गझल समाजमनापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरेश भट यांनी खूप परिश्रमपूर्वक केले. कवितेची विपुल प्रमाणात समीक्षा झालेली आपल्याला दिसते; मात्र गझलेची समीक्षा तेवढी झालेली दिसत नाही, हा एकप्रकारे ग़झलवर झालेला अन्याय आहे, अशी खंत रिद्धपूर मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी व्यक्त केली.
 

marath  
 
तिसर्‍या अखिल भारतीय एल्गार मराठी ग़झल संमेलनाच्या समारोप सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. स्व. सुरेश भट स्मृती प्रतिष्ठान आणि वसंतराव पालेकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दोन दिवसीय संमेलनाचा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे समारोप झाला. मंचावर संमेलनाचे उद्घाटक शाहीर सुरेशकुमार वैराळकर आणि स्वागताध्यक्ष नाना लोडम उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना लोडम यांनी ग़झल उपासनेच्या ध्येयातून मराठी गझल परिषदेची निर्मिती करण्यात आलेली असून हा मंच येत्या काळात ग़झल संबंधी विविध उपक्रम राबवेल, असे सांगितले. वैभव जोशी यांनी नवीन गझल लिहिणार्‍यांना सोशल मीडियावर पोस्ट होण्याची अजिबात घाई न करण्याचे आवाहन केले. समारोप सोहळ्यात स्व. व्यंकटराव देशमुख स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते ग़झलकार गजानन वाघमारे यांना प्रदान करण्यात आला. मंचावर संदीप व्यंकट देशमुख, मंगेश देशमुख, क्षिप्रा देशमुख आणि वल्लरी देशमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप देशमुख यांनी केले. आभार नाना लोडम यांनी मानले.
 
 
Marathi Ghazal गझल संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी भरगच्च कार्यक्रम झाले. यात दिवंगत ग़झलकारांच्या स्मरणार्थ सात दमदार मुशायरे झाले. दुपारी शिवाजी जवरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी ग़झलचं वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर संवादी स्वरूपाचा परिसंवाद रंगला. ‘सोबतीचा करार’ या सुरेल ग़झल मैफलीने संमेलनाची सांगता झाली. सबकुछ वैभव जोशी अशी टॅगलाईन असलेल्या या सुश्राव्य मैफिलीत आशिष मुजुमदार यांनी संगीतबद्ध केलेल्या वैभव जोशी यांच्या गझलांचा रसास्वाद गायक दत्तप्रसाद रानडे यांनी रसिकांना भरभरून दिला.