परीक्षे पे चर्चा : पंतप्रधान मोदींसाठी विद्यार्थ्यांनी आणला टिफिन

09 Feb 2026 12:46:32
तामिळनाडू,
Pariksha Pe Charcha पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा परीक्षे पे चर्चा कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचा दुसरा एपिसोड असून, मोदींनी परीक्षेच्या काळातील ताणतणाव, अभ्यासाचं नियोजन आणि ज्ञान आत्मसात करण्याच्या खास तंत्रांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 

safr  
मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितले की, “वर्गातील सर्वात ढ मुलांशी मैत्री करा आणि त्याला गणित शिकवायला सांगा. शिकवताना स्वतःला मेंदूला ताण द्या. त्यामुळे विषय तोंडपाठ होईल आणि थेट परीक्षेत फायदा होईल.” या कानमंत्रासारख्या तंत्राने विद्यार्थी अभ्यासात सुधारणा करू शकतात, असे मोदींनी स्पष्ट केले.
 
 
मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद Pariksha Pe Charcha  साधताना कार्यक्रम वेगळा आणि खास असल्याचंही सांगितलं. देशभरात परीक्षे पे चर्चा आयोजित करण्यामागचाही उद्देश विद्यार्थ्यांच्या आवाजाला प्राधान्य देण्याचा आहे, असे ते म्हणाले. यावेळी मोदींनी सांगितले की, “मी अनेक वर्षांपासून 10 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आलो आहे. ते मला विचारतात की भविष्यात काय करायचं. स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करा, मित्रांबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील कौशल्यांचा लाभ घ्या आणि स्टार्टअप्स सुरू करा.”कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांसाठी खास टिफिनही आणला होता. एका विद्यार्थ्याने त्यांना चकली दिली, तर दुसऱ्या विद्यार्थ्याने छत्तीसगडी खुरमी दिली. मोदींनी चकली कशी बनते, असा सवाल विद्यार्थ्यांकडे केला, आणि त्यांनी बेसनापासून गोल आकार देऊन तळल्याची माहिती दिली. खुरमीबाबतही त्यांनी गुळ, पीठ आणि सूजी वापरून तयार केल्याचे ऐकले. पंतप्रधान मोदींनी या सर्व पदार्थांचा आस्वाद घेतला आणि विद्यार्थ्यांना हाताने खायला घालून संवाद अधिक सजीव केला.हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, त्यांनी मोदींच्या अभ्यास तंत्र आणि भविष्यातील मार्गदर्शनावर भर दिला. परीक्षे पे चर्चा विद्यार्थ्यांना अभ्यासात सुधारणा आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत करणारा उपक्रम म्हणून ओळखला जात आहे.
Powered By Sangraha 9.0