अमरावतीत उद्यापासून पोलिस भरती प्रक्रिया

09 Feb 2026 20:38:42
२१४ पदांसाठी होणार भरती
अमरावती
Police recruitment in Amravati अमरावती ग्रामीण पोलिस दलातर्फे पोलिस शिपाई संवर्गातील एकूण २१४ रिक्त पदांची भरती प्रक्रिया ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ती २६ फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. सदर भरती प्रक्रियेत एकूण पदांपैकी सर्वसाधारण ६९, महिला ६४, खेळाडू १०, प्रकल्पगस्त १०, भुकंपग्रस्त ४, माजी सैनिक ३१, अंशकालीन पदवीधर १०, पोलिस पाल्य ६, गृहरक्षक १० प्रमाणे प्रवर्गनिहाय पदांची भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. सदर भरती करिता ऑनलाईन पध्दतीने एकूण २१ हजार २०६ अर्ज प्राप्त झाले असून त्यामध्ये पुरुष उमेदवार १६ हजार २८६ व महिला उमेदवार ४ हजार ९२० आहेत. ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान पुरुष तर २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान महिला उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी व शाररिक चाचणी
 
 
poldksldk
 
Police recruitment in Amravati  घेण्यात येणार आहे. १५ ते १९ फेब्रुवारी व २२ फेब्रुवारी रोजी शासकीय सुटी असल्याने या दिवशी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार नाही. सदर भरती प्रक्रिया जोग स्टेडियम, पोलिस आयुक्त कार्यालयाचे मागे, मालटेकडी जवळ येथे आयोजीत करण्यात आली आहे. सुरूवातीला दररोज अंदाजे ८०० तर शेवटी २००० उमेदवारांना भरती प्रक्रियेतील शाररीक चाचणीसाठी बोलावण्यात आले आहे. भरती करिता बाहेर गावावरुन येणार्‍या उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था वसंत हॉल, मालटेकडी येथे निशुल्क करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी भरतीकरिता त्यांना नेमूण दिलेल्या दिनांकास सकाळी ५ वाजता भरतीस्थळी कागदपत्रांसह हजर राहणे बंधनकारक आहे. जिल्हा पोलिस शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पैश्यांची किंवा तत्सम अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधीत उमेदवाराने त्याबाबतची माहीती त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती यांचे दुरध्वनी क्र.०७२१-२५५३०५५ वर तसेच पोलिस अधिक्षक,अमरावती ग्रामीण यांना त्वरीत संर्पक साधून करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांनी अडचण असल्यास हेल्पलाईन क्रं. ७०३०००६८१९ वर संर्पक साधावा,असे कळविण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0