लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ४५०० रुपये तर शेतकऱ्यांना ६ हजार

    दिनांक :09-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Ladki Bahin Yojana, राज्यातील लाखो लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात प्रत्येकी ४,५०० रुपये तर शेतकऱ्यांच्या खात्यात ६,००० रुपये जमा होणार आहेत, अशी नवीन माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना तीन हप्त्यांचे एकत्रित पैसे तर शेतकऱ्यांना दोन हप्त्यांचे एकत्रित पैसे मिळण्याची शक्यता आहे.
 

Ladki Bahin Yojana, 
राज्यात सध्या सव्वादोन कोटी महिला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहेत, पण डिसेंबरपासून अद्याप त्यांना एकाही हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील ९३ लाख शेतकऱ्यांना आठव्या आणि नवव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. या दोन योजनांचा लाभ देण्यासाठी राज्याला अंदाजे १४,००० कोटी रुपयांची आवश्यकता आहे, मात्र अद्याप अर्थ खात्याकडून निधी मंजूर झालेला नाही.
 
 
मंत्रालयातील विश्वासू सूत्रांनी Ladki Bahin Yojana, सांगितले की, शेतकऱ्यांना ६,००० रुपये तर लाडक्या बहिणींना ४,५०० रुपये एकत्रित मिळू शकतात. लाडक्या बहिणींच्या ईकेवायसी पडताळणीच्या प्रक्रियेनंतर लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या १.५ कोटींपर्यंत वाढू शकते. या पडताळणीनंतर राज्याला दर महिन्याला १,६३५ कोटींची बचत होईल, म्हणजे वर्षाला १९,६२० कोटींची बचत होईल असा अंदाज आहे.फेब्रुवारीच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारचा २२ वा हप्ता जमा होईल, तर राज्य सरकारकडून आठवा व नववा हप्ता दिला जाईल. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या ९१ लाख १६ हजार शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली असून त्यांना लाभ मिळणार आहे.लाडकी बहिण योजनेची पडताळणी अखेरच्या टप्प्यात आहे आणि पात्र महिलांच्या खात्यात एप्रिलपासून दरमहा १,५०० रुपयांचा लाभ जमा होईल. राज्यात लाडकी बहिण योजना १ जुलै २०२४ पासून सुरू झाली असून, यामध्ये ५० लाखांपेक्षा जास्त अपात्र महिलांनीही अर्ज केला होता. आता या सर्वांची पडताळणी पूर्ण झाली असून, १ एप्रिल २०२६ पासून फक्त पात्र महिलांना लाभ मिळणार आहे.योजना अंमलबजावणीमध्ये आलेल्या विलंबामुळे लाभार्थींमध्ये ताण दिसून आला होता, परंतु पडताळणी पूर्ण झाल्यामुळे लवकरच लाखो महिलांना आणि शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत मिळेल, असा आनंदी अंदाज अधिकारी व्यक्त करत आहेत.