दादांच्या लाडकीचा पराभव सोशल मीडियावर 'हिट' पण राजकारणात 'फ्लॉप'

09 Feb 2026 14:19:55
पुणे,
Nirmala Navale सोशल मीडियावरील आक्रमक शैलीमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. कारेगाव गटातून त्यांनी पराभव पत्करला असून, मनीषा पाचंगे यांनी त्यांचा पराभव करत विजय मिळवला आहे.
 

Nirmala Navale  
निर्मला नवले केवळ शिरूर तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडिओंमुळे प्रसिद्ध आहेत. माजी सरपंच म्हणून त्यांनी केलेली कामे आणि बोलण्याची खास शैली यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता निश्चित मानली जात होती. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात मतदारांनी मनीषा पाचंगे यांच्यावर आपले मत टाकले.निर्मला नवले यांच्या सभांना निवडणुकीच्या प्रचारात मोठी गर्दी होत होती, तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून बहुतेक लोकांना वाटत होते की ही निवडणूक त्यांची सहज जिंकलेली ठरेल. मात्र, ग्राऊंड लेव्हलवर मनीषा पाचंगे यांनी केलेल्या नियोजित आणि प्रभावी प्रचारामुळे प्रत्यक्ष निकालात बदल झाला आणि निर्मला नवले यांना पराभवाचा सामना करावा लागला.शिरूर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील या निकालाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला गती दिली आहे, तसेच सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि निवडणुकीतील यश यामध्ये नेहमी असलेली फरक स्पष्ट झाला आहे.
Powered By Sangraha 9.0