मनोज जरांगे पाटील मनोरुग्ण

    दिनांक :09-Feb-2026
Total Views |
मुंबई
Manoj Jarange Patil राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताईंवर शपथविधीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय वादावर काँग्रेस नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार भाष्य केले आहे. हाके यांनी सुनेत्रा ताईंवरील टीका करणाऱ्या काही नेत्यांवर कटाक्ष साधत म्हटले की, रोहित पवारांनी अजित पवारांच्या मृत्यूचा भांडवल करण्यापेक्षा जर त्यांच्या कडे काही ठोस पुरावे असतील तर त्यांनी ते समोर आणावे.
 

Manoj Jarange Patil  
हाके यांनी मनोज जरांगे Manoj Jarange Patil  यांच्या टीकेवरही प्रत्युत्तर दिले. जरांगे यांनी तटकरे, मुंडे, भुजबळ, पटेल अशा नेत्यांना “ढेकणे” आणि “झुरळे” म्हणून संबोधित केले होते. हाके यांनी हे स्पष्ट केले की, या ढेकणा, झुरळांनी अपघातात निधन झालेल्या अजित पवारांच्या पत्नीला उपमुख्यमंत्री केले आहे. “जरांगे पाटील यांची मानसिकता तपासली पाहिजे. शरद पवार, रोहित पवार आणि बजरंग सोनवणे यांच्या स्क्रिप्टवरून बोलणारा हा माणूस स्वतःच्या डोक्याने काही बोलत नाही, त्यामुळे त्यावर जास्त बोलणे गरजेचे नाही,” असे हाके म्हणाले.सुनेत्रा ताईंवरील टीकेबाबत हाके यांनी स्पष्ट केले की, राजकारणात टायमिंग महत्त्वाचे असते. जर शरद पवारांनी योग्य वेळ ठरवला नसता, तर सुनेत्रा ताईंवर अन्याय होऊ शकला असता. “सुनेत्रा ताईंवर राजकारणाचे चांगले ध्येय आहे आणि त्यांनी राज्यात प्रभावी कामगिरी केली तर अजितदादांपेक्षाही उत्तम नेतृत्व करतील,” असे हाके म्हणाले.
 
 
हाके यांनी आकड्यांवर Manoj Jarange Patil  भाष्य करत सांगितले की, जर आकड्यांचे गणित जुळले तर शरद पवार राज्यसभेवर जातील, पण त्यांच्याजवळ गणित जुळेल असे वाटत नाही.यासोबतच हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवरही भर दिला. त्यांनी आरोप केला की, दिवसा ढवळ्या ओबीसींचे आरक्षण संपवण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. कोल्हापूर, अहिल्यानगर येथील महापौर पदांमध्येही ओबीसी समाजाला वगळण्यात आले. पंचायत समितीच्या निवडणुकीत मतांचा बाजार चालतोय, पैशाच्या जोरावर लोकशाहीचा अपमान होत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी उपस्थित केला.
हाके यांनी सांगितले की, सध्या राज्यात चाललेल्या या परिस्थितीमुळे लोकशाहीची खरी आत्मा धोक्यात आहे, आणि ओबीसी समाजासह सर्व प्रबुद्ध नेत्यांनी यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.या वक्तव्यांनंतर सुनेत्रा ताईंवरील टीका करणाऱ्यांवर राजकीय वाद अधिकच गडद होण्याची शक्यता आहे.