पिंकी माळीच्या निधनानंतर माळी कुटुंबावर दुहेरी आघात

01 Mar 2026 11:36:26
बारामती
Pinky Mali २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघाताने महाराष्ट्र आणि देशभरात शोककळा पसरवली होती. या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, पायलट कॅप्टन सुमित कपूर आणि सह-पायलट कॅप्टन शांभवी पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
 
 

Pinky Mali  
 
या दुर्दैवी Pinky Mali  घटनेनंतर माळी कुटुंबीयांवर मोठा आघात बसला आहे. पिंकी माळी यांच्या आई माया माळी यांना मुलीच्या निधनामुळे जबरदस्त मानसिक धक्का बसला असून त्यांची प्रकृती अचानक खालावली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दादर येथील Shushrusha Citizens’ Co-operative Hospital Limited मध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या महिनाभरापासून माया माळी सतत दुःख आणि रडत आहेत.पिंकी माळी यांच्या निधनानंतर माळी कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही चिंतेची झाली आहे. पिंकीचे वडील टॅक्सीचालक आहेत आणि रुग्णालयातील उपचारांचा खर्च लाखांच्या घरात असल्याने कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे आहे. मुलगी गमावल्यानंतर आता पत्नीच्या जीवासाठी त्यांना मदतीसाठी धावपळ करावी लागत आहे. वडिलांनी मित्रपरिवार आणि विविध समाजसंस्थांकडे मदतीसाठी हात पसरवला असून, त्यांनी तातडीच्या मदतीची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे.माळी कुटुंबीयांचे हृदय दुःखाने फाटलेले असून, पिंकीच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुहेरी आघात बसला आहे. वडिलांनी आर्त हाक मारली आहे, “मुलगी गेली, आता पत्नीला वाचवा,” ही परिस्थिती त्यांच्या दुखःकथा आणि आर्थिक संघर्षाचे प्रतिक आहे.सदर घटना केवळ अपघात आणि वैयक्तिक दुर्दैव म्हणूनच नाही, तर ती समाजाला सुरक्षिततेच्या आणि आपत्तीच्या वेळी मदतीच्या महत्त्वाची आठवणही करून देते.
Powered By Sangraha 9.0