बल्क मिल्क कुलरच्या सुविधामुळे दूध उत्पादनांला नवसंजीवनी

01 Mar 2026 20:56:44
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
दूध उत्पादनाला नवसंजीवनी मिळणार
दोन हजार लिटर क्षमतेच्या बल्क कुलरचे उद्घाटन

नागपूर,
दोन हजार लिटर क्षमतेच्या Bulk milk cooler बल्क मिल्क कुलरची सुविधा उपलब्ध होणे ही मेळघाटमधील परिवर्तनाची नांदी आहे. यातून स्थानिक दूध उत्पादनांला नवसंजीवनी मिळेल. रोजगार निर्मिती आरोग्य व्यवस्था सुधारेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
 
moter
 
धारणी येथे दोन हजार लिटर क्षमतेच्या बल्क मिल्क कुलरचा उद्घाटन सोहळा आणि दूध उत्पादक शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी संवाद साधला. यावेळी एनडीडीबीचे चेअरमन मिनेश शहा, व्यवस्थापकीय संचालक सी.पी. मिल्क प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्ष वर्षा चव्हाण, निरुपमा देशपांडे, डॉ. रवी कोल्हे आदींची उपस्थिती होती. मेळघाटमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात गडकरी यांनी आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता केल्याचे समाधान गडकरी यांनी व्यक्त केले.
दूध उत्पादनासाठी मदर डेअरीचा पुढाकार
Bulk milk cooler  ते पुढे म्हणाले, ‘मदर डेअरीचा हा पुढाकार मेळघाटच्या विकासासाठी आवश्यक होता. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास भाग म्हणून मेळघाट ओळखला जातो. हा भाग समृद्ध होणे, याठिकाणी रोजगार उपलब्ध होणे, येथील परिस्थिती सुधारणे आवश्यक होते. त्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. मदर डेअरीचा हा उपक्रम देखील त्याचाच एक भाग होय. मेळघाटमध्ये दूध उत्पादन वाढविण्याच्या संदर्भात चांगले काम होत आहे. त्यासोबतच मक्याचेही उत्पादन येईल. नेपियर ग्रास किंवा मका लावून त्याचे फॉडर तयार करून सायलेजमध्ये ठेवले तर आपण वर्षभर हिरवा चारा देऊ शकतो, याचाही गडकरी यांनी उल्लेख केला.

मदर डेअरीचा साडेपाचशे कोटींचा प्रकल्प
Bulk milk cooler  नागपुरात मदर डेअरीचा साडेपाचशे कोटींचा प्रकल्प उभा होत आहे. याअंतर्गत विदर्भ-मराठवाडातील दूध गोळा करून आईस्क्रीम, पनीर चीज, संत्राबर्फी आदी उत्पादने होतील. मध्य व दक्षिण भारतात बाजारपेठही उपलब्ध होईल. त्यामुळे मेळघाटमधून जेवढे जास्त दूध होईल तेवढे खरेदी केली जाईल आणि शेतकर्‍यांना तेवढाच जास्त नफा देखील मिळेल, असेही. गडकरी म्हणाले. जास्त दूध देणार्‍या गायी व म्हशी एम्ब्रियो ट्रान्सफरच्या माध्यमातून निर्माण करण्यात याव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.

एक लाख लिटर दुधाचे लक्ष्य
शेतकर्‍यांना पशूवैद्यकीय मार्गदर्शन शेतकर्‍यांना देण्याची गरज आहे. तांत्रिकदृष्ट्या गोठा कसा तयार करायचा याबाबतीत मदर डेअरी मदत करणार आहे. दुधाचे उत्पादन वाढेल तरच नफा वाढेल. मेळघाटमध्ये चारा मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते शक्य आहे. मेळघाटमधून एक लाख लिटर दूधाच्या उत्पादनाचे लक्ष्य आम्ही बाळगले आहे, असेही गडकरी म्हणाले.
शिशू संजीवनी प्रकल्प
३ ६ वर्ष वयोगटातील तसेच अंगणवाडीतील मुलांसाठी शिशू संजीवनी कार्यक्रमाचे देखील उद्घाटन यावेळी झाले. यामध्ये मेळघाट येथील ५० गावांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येईल. पुढील टप्प्यांमध्ये ३२० गावांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे.
Powered By Sangraha 9.0