गडरलाईनचे शेकडो पाईप आगीत जळून खाक

01 Mar 2026 16:55:03
नागपूर
Narsala water supply, चाणक्यपुरम येथील सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ ठेवलेले गडरलाईनचे शेकडो प्लास्टिक व सिंथेटिक पाईप भस्मसात झाले आहेत. सकाळी १० वाजता अचानक लागलेल्या आगीत नागरिकांना ताबडतोब भीतीचे वातावरण निर्माण झाले.
 

Chanakyapuram fire, Narsala water supply, 
घटनास्थळी राहणाऱ्या रहिवासी जितेंद्र मुळे यांनी फायरब्रिगेडला तत्काळ माहिती दिली. अवघ्या १५-२० मिनिटांत फायरब्रिगेडच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. फायरब्रिगेड आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे आगीचा प्रसार रोखला गेला, अन्यथा आसपास ठेवलेल्या इतर पाईप आणि आजूबाजूची घरेही धोक्यात येऊ शकली असती.
सुरुवातीच्या प्राथमिक अंदाजानुसार, मोकळ्या जागेत कचरा जाळल्यामुळे आग पाईपपर्यंत पोहोचल्याचे दिसते. ही आग नियंत्रणात आली असली तरी शेकडो पाईप पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठे आहे.या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि रहिवाशांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना वाढवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
Powered By Sangraha 9.0