सहकार्य नगरात संभाजीराजे जीवनकथा व्याख्यान

01 Mar 2026 14:41:29
नागपूर,
Chhatrapati Sambhajiraje Bhosale सहकार्य नगर येथे वीर हनुमान मंदिर परिसरात सप्ताह दिनानिमित्त छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवनकथा व हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी सातारा येथील संभाजी ब्रिगेड चे सुप्रसिद्ध वक्ते अभिजीत पवार यांनी सेवा वस्तीतील मुलांना मार्गदर्शन केले. त्यांनी संभाजीराजे यांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणादायी माहिती प्रभावी शैलीत मांडली.
 
234
 
 
अभिषेक शेंडे, अतुल राऊत व प्रणय अरसपूरे यांच्या तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सुरेश चव्हारे यांनी उपस्थित नागरिक व पाहुण्यांचे आभार मानले.Chhatrapati Sambhajiraje Bhosale त्यानंतर प्रसाद वितरण करण्यात आले.वरील बातमी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात यावी, ही नम्र विनंती.
सौजन्य:सुरेश चव्हारे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0