जिल्ह्यात सघन कापूस लागवडीवर भर देण्यात यावा : आ. वानखेडे

01 Mar 2026 17:27:36
वर्धा,
Sumit Wankhede  जिल्ह्यातील ४० गावांमध्ये प्रत्येकी १०० हेटर असे ४ हजार हेटरवर सघन लागवड पद्धतीने कापसाची लागवड करण्यासाठी कृषी विभागाने शेतकर्‍याचे लस्टर तयार करावे, असे आवाहन आ. सुमित वानखेडे यांनी केले.
 

Dense cotton cultivation wardha, 
इंडो कॉटन डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने कृषी विभागाच्या सहकार्याने आणि बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत सघन लागवड पद्धती व कापूस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., उपस्थित होत्या. आ. वानखेडे यांनी सघन कापूस लागवड ही बाब नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून राबविण्यात यावी, असे देखील सांगितले.
जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी कृषी विभाग आणि आत्माच्या सहकार्यने सघन लागवड पद्धतीसाठी शेतकर्‍याचे प्रशिक्षण, शेतीशाळा आणि अभ्यास दौरे घेण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे, असे सांगितले. डॉ. शुभ्रा देशपांडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. आयसीडीएचे उपाध्यक्ष डॉ. राजू ठाकरे यांनी स्वागतपर भाषण केले. तांत्रिक सत्रात सघन लागवड पद्धती आणि लागवड तंत्रज्ञान या विषयावर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी मार्गदर्शन केले. सघन लागवड पद्धती आणि कापूस विपणन या विषयावर वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. गोविंद वैराळे यांनी मार्गदर्शन केले. कापसाच्या गुणवत्तेचे मापदंड व कापणीनंतरची व्यवस्थापन पद्धती याविषयावर वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. के. पांडयेन यांनी मार्गदर्शन केले. विभागीय एकत्रीकरण व समूह सक्षमीकरणाद्वारे शेतकर्‍यांना कापूस पिकात उच्च घनता लागवड पद्धती आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन यांच्याशी जोडणे या विषयावर पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, उपविभागीय कृषी अधिकारी वैष्णवी शिंदे, स्मार्टचे नोडल अधिकारी रोहन झांजरे, जीवनोन्नती अभियानाचे व्यवस्थापक निरज नखाते, विदर्भ कॉटन असोसिएशनचे संचालक भावेश शहा यांनीही मार्गदर्शन केले.
Powered By Sangraha 9.0