धनुषचा ‘कारा’ ३० एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित

01 Mar 2026 11:26:01
मुंबई
, Kara film ‘तेरे इश्क में’ या हिंदी चित्रपटातील प्रभावी भूमिकेमुळे चर्चेत असलेला दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेता धनुष आता आपल्या नव्या प्रकल्पामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. दिग्दर्शक विघ्नेश राजा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या ‘कारा’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची प्रदर्शन तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. हा अ‍ॅक्शन एंटरटेनर ३० एप्रिल २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
 

Dhanush upcoming movie, Kara film release date April 30 2026, 
चित्रपटाचे निर्माते इशारी , Kara film  के. गणेश यांनी वेल्स विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात ही घोषणा केली. ‘कारा’ हा चित्रपट त्यांच्या वेल्स फिल्म इंटरनॅशनल या निर्मिती संस्थेअंतर्गत तयार करण्यात आला आहे. यावेळी बोलताना गणेश यांनी धनुषसोबतचा ‘वाडा चेन्नई २’ हा आपला स्वप्नातील प्रकल्प असल्याचेही नमूद केले. ते वेल्स विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलपतीही आहेत.
यावर्षी पोंगलच्या दिवशी ‘कारा’चे शीर्षक आणि पहिला पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. पोस्टरमध्ये धनुषचा तीव्र आणि दमदार लूक पाहायला मिळाला. “कधीकधी धोकादायक असणे हा जगण्याचा एकमेव मार्ग असतो,” असा प्रभावी संदेश पोस्टरवर झळकला होता. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.‘कारा’ हा चित्रपट यापूर्वी #D54 या नावाने ओळखला जात होता. या चित्रपटात अभिनेत्री ममिता बैजू मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच दिग्दर्शक-अभिनेता के. एस. रविकुमार, जयराम, सूरज वेंजारामूडू, करुणास आणि पृथ्वी पंडिराज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.धनुषच्या चाहत्यांमध्ये ‘कारा’बद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, अ‍ॅक्शनप्रधान कथानक आणि दमदार स्टारकास्टच्या जोरावर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता ३० एप्रिल २०२६ रोजी या चित्रपटाची प्रेक्षकांशी होणारी भेट कितपत यशस्वी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0