काटोल येथील बारुद कंपनीत मोठा स्फोट; १५ जणांचा मृत्यू

01 Mar 2026 10:01:18
काटोल, 
explosion-at-ammunition-factory-in-katol नागपूर जिल्ह्यात झालेल्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. नागपूरच्या काटोल तालुक्यातील एसबीएल कंपनीत हा भीषण स्फोट झाला. या कंपनीत स्फोटक डेटोनेटर्स आणि स्फोटके तयार केली जातात. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटक कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान १५ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. काही लोक गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. जखमींना नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..
 
explosion-at-ammunition-factory-in-katol
 
माहितीनुसार, राऊळगावमधील एसबीएल कंपनीत सकाळी सुमारे सात वाजून दहा मिनिटांवर पहिला स्फोट झाला. कंपनीमध्ये स्फोटके तयार करण्याचे काम सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागल्याची माहिती आहे. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. explosion-at-ammunition-factory-in-katol घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे तसेच आत अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्याचे काम सुरू केले. जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. explosion-at-ammunition-factory-in-katol कंपनीत काम करणारे बहुतेक कामगार आसपासच्या गावांतील असल्याचे समोर आले आहे. राऊळगाव परिसर जंगलाने वेढलेला असून येथे अनेक खासगी स्फोटक कंपन्या आहेत. हा बफर झोन असल्याने येथे मोठी वस्ती नाही. परिसरातील नागरिकांनी स्फोटाचा आवाज ऐकून घटनास्थळी गर्दी केली आहे. स्फोटामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सध्या स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. काही प्रत्यक्षदर्शींनी पहिल्या स्फोटानंतर आणखी स्फोट झाल्याचे सांगितले आहे. या दुर्घटनेची चौकशी सुरू असून बचावकार्य सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0