विश्व कल्याणाचे तत्वज्ञान प्रामाणिकपणाने राबवा

01 Mar 2026 21:18:58
बाजीप्रभुनगरात सकल हिंदू संमेलन
 
नागपूर,
‘ सर्वजन हिताय, सर्व जन सुखाय ‘असे विश्व कल्याणाचे सामर्थ्य असलेले तत्वज्ञान हिंदू समाजाने प्रामाणिकपणाने आपल्या जीवनात राबवण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक वरिष्ठ नेते, अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य व माजी सर कार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. बाजीप्रभू नगरच्या उद्यानात विराट सकल 'Hindu Sammelan', हिंदू संमेलनात ते बोलत होते. याप्रसंगी विशेष अतिथि म्हणून रामकृष्ण मठाचे स्वामी ज्ञानगम्या नंद, डॉ. दत्तात्रय गारवे, जयश्री राठोड आदी उपस्थित होते.
 
 
BAJIPRABHUNAGAR-HINDU
 
 
बाज़ीप्रभुनगर, संजयनगर, पांढराबोडी येथील नागरिक मोठया संख्येने सकल संमेलनात सहभागी झाले होते. रामकृष्ण मठाचे स्वामी ज्ञानगम्यानंद म्हणाले, भारतातील विलक्षण धर्मदृष्टीचा वारसा प्रामुख्याने दोन गोष्टींमध्ये आहे त्यातील प्रथम म्हणजे भारतात असा एकही कालखंड नाही जेव्हा दिव्य विलक्षण , दिव्य अनुभूती व दिव्य शक्तींनी संपन्न महपुरूष भारतात नव्हते व जेव्हा जेव्हा समाजापुढे संकटे आलीत तेव्हा तेव्हा ह्या व्यक्तींनी ज्या प्रवर्तन केले. 'Hindu Sammelan', आपल्या देशातील कुटुंब व्यवस्थेने जपले, हेच आपल्या विलक्षण आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसाचे रहस्य आहे. त्यामुळे आपल्या देशातील कुटुंब व्यवस्था देखील तेवढीच महत्वाची आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस बाजीप्रभूनगरच्या रहिवाशांनी एकाहून एक सरस देशभक्तिपर गीते सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय देशपांडे, आसावरी देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0