इराणचा ओमानच्या तेलवाहू जहाजावर हल्ला; जहाजावर भारताचे १५ कर्मचारी उपस्थित

01 Mar 2026 14:53:57
मस्कत,  
iran-attacks-omani-oil-tanker ओमानच्या मुसांडम द्वीपकल्पाजवळ अवघ्या पाच सागरी मैलांवर पलाऊ ध्वजाखाली चालणाऱ्या ‘स्कायलाइट’ या तेलवाहू जहाजावर रविवारी इराणने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. जहाजावरील सर्व २० खलाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात यश आले असून त्यापैकी १५ जण भारतीय नागरिक आहेत. या हल्ल्यात चार जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे मध्यपूर्वेत तणाव अधिकच वाढला आहे.
 
iran-attacks-omani-oil-tanker
 
दरम्यान, इराणकडून होत असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. इराणने आक्रमक भूमिका कायम ठेवल्यास यापूर्वी कधीही न पाहिलेला प्रत्युत्तरात्मक प्रहार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर अमेरिकेने इराणवर नव्याने हल्ल्यांची मालिका सुरू केल्याचे वृत्त आहे. तेहरानमध्ये विविध ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे सांगितले जात आहे. iran-attacks-omani-oil-tanker या कारवाईत इराणच्या लष्करप्रमुख मुसावी यांचा मृत्यू झाल्याचा अमेरिकेचा दावा आहे. दुसरीकडे, इराणकडून इस्रायलसह संपूर्ण मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांवर हल्ले सुरूच असल्याची माहिती समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही कठोर भूमिका व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसांत दहशतवादी शासनाशी संबंधित हजारो ठिकाणांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. इराणमधील नागरिकांनी ही संधी दवडू नये आणि अत्याचाराविरोधात एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. iran-attacks-omani-oil-tanker फारसी, कुर्द, अझरबैजानी, अहवाझी आणि बलुची समुदायांनी एकत्र येऊन स्वतःचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पुढे यावे, असे ते म्हणाले. मध्यपूर्वेतील या वाढत्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Powered By Sangraha 9.0