मुंबई
Sanjay Raut इराण आणि इस्त्रायलदरम्यान सुरू झालेल्या भयंकर युद्धाने आंतरराष्ट्रीय राजकारणाला हलवून टाकले आहे. शनिवारी (२८ फेब्रुवारी २०२६) इस्त्रायलने अमेरिकेसोबत संयुक्त कारवाई करत इराणवर हल्ला केला, त्यानंतर तेहरानने प्रत्युत्तर स्वरूपात पश्चिम आशियामधील अमेरिकन एअरबेसवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या संघर्षात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाले असून युद्धाची परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले की, मोदी इस्रायल, इराण आणि अमेरिकेसोबतच्या या युद्धाला थांबवू शकले नाहीत. “अमेरिका, इराण, इस्रायल युद्धात खामोनी आणि त्यांचे कुटुंब ठार झाले. मोदी दोन दिवसांपूर्वीच इस्रायलहून परतले आणि दुसऱ्याच दिवशी युद्ध पेटले, हा योगायोग असू शकत नाही. मोदी ट्रम्प आणि नेतन्याहू यांचे जवळचे मित्र आहेत. भारताने इराणच्या बाजूने धोरण आखले होते, विशेषतः काश्मीर प्रश्नावर इराण भारताचा मित्र होता. मात्र आता युद्धामुळे भारताला आर्थिक आणि राजकीय आव्हाने भेडसावणार आहेत,” असे राऊत म्हणाले.
संजय राऊत Sanjay Raut यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, “भारत आणि पाकिस्तानचे युद्ध थांबवण्याचे काम राष्ट्राध्यक्ष ट्रम्प करतात, तर मोदी इस्रायल-इराण-अमेरिका युद्ध का थांबवू शकत नाहीत?” राऊत यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका करत म्हटले की, “भारताने केलेल्या ट्रेड डीलमुळे आपण अमेरिकेचा गुलाम बनलो आहोत. इराणवर अमेरिका-इस्त्रायल ताबा मिळवत आहेत आणि हळूहळू भारताकडे पावले वळतील. पर्यटक अडकले आहेत, विमानतळावर हल्ला झाला आहे, तर भारतीय परराष्ट्र खात्याने आता काय भूमिका घेतली पाहिजे?”
संपूर्ण परिस्थितीवर भाष्य करत Sanjay Raut राऊत म्हणाले की, “अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे खामोनी ठार झाले आहेत. ही घटना केवळ इराण किंवा इस्त्रायलची नाही, तर जगात कुठल्याही राष्ट्रावर येऊ शकते. मोदी हे विश्वगुरू आहेत. म्हणूनच विश्वगुरूंनी जागतिक स्तरावर योग्य भूमिका घेणे गरजेचे आहे.”
या विधानामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणावर राजकीय चर्चेला नवीन वळण मिळाले असून, इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम भारताच्या राजकीय आणि आर्थिक धोरणांवर कसा होतो, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.