खामेनेई यांचे यूपीशी खास संबंध; छोट्या गावाशी जोडलेला सर्वोच्च नेत्याचा इतिहास

01 Mar 2026 13:38:50
बाराबंकी,  
khameneis-relationship-with-barabanki इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे मूळ उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर बाराबंकीतील किंटूर परिसरात शोककळा पसरली. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही बातमी कळताच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या वडिलोपार्जित घराकडे जमले. परिसरात उदास वातावरण होते. अनेक जण मोबाईलवर येणाऱ्या घडामोडी पाहत होते, तर काही त्यांच्या आठवणींना उजाळा देत होते.
 
khameneis-relationship-with-barabanki
 
किंटूर हे गाव खामेनेई कुटुंबाशी असलेल्या ऐतिहासिक नात्यामुळे पूर्वीपासून चर्चेत राहिले आहे. येथे राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनी ही घटना अत्यंत वेदनादायक असल्याचे सांगितले. khameneis-relationship-with-barabanki त्यांच्यामते हे नुकसान केवळ इराणपुरते मर्यादित नसून संपूर्ण जगासाठी दुःखद आहे. वाढत्या आंतरराष्ट्रीय तणावाबद्दल स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आणि शांतता, बंधुभाव व संयम राखण्याचे आवाहन केले.
गावात आणि आसपासच्या भागात शोकसभा आयोजित करण्यात आल्या. अनेकांनी दिवंगत नेत्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली. कुटुंबातील सदस्य सय्यद निहाल अहमद काझमी यांनी ही बातमी अतिशय वेदनादायक असल्याचे सांगत जगात शांतता प्रस्थापित व्हावी, अशी प्रार्थना केली. त्यांचे पुत्र सय्यद आदिल काझमी यांनी सांगितले की त्यांनी खामेनेई यांना प्रत्यक्ष पाहिले नव्हते, मात्र घरातील वडीलधाऱ्यांकडून त्यांच्या विषयी अनेक कथा ऐकल्या होत्या. khameneis-relationship-with-barabanki निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कुटुंब दुःखी झाले असून घरातील त्यांच्या छायाचित्रांसमोर नातेवाईक अश्रू ढाळत आहेत.
किंटूरमध्ये सध्या शोकाचे वातावरण असून लोक प्रार्थना आणि शोकसभांद्वारे भावना व्यक्त करत आहेत. स्थानिक नागरिकांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला संवाद आणि शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. हिंसाचार कोणत्याही समस्येचे उत्तर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0