खरांगणा येथे विशाल हिंदू संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

01 Mar 2026 21:18:33
खरांगणा, 
kharangana-hindu-sammelan : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्धी वर्षानिमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने आज रविवार १ मार्च रोजी आयोजित विशाल हिंदू संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी संत सयाजी महाराज प्रमुख पाहुणे म्हणून तर रा. स्व. संघाचे जिल्हा बौद्धिक प्रमुख प्रवीण वखरे प्रमुख वते म्हणून उपस्थित होते. व्यासपिठावर जयकरण शुला यांची उपस्थिती होती.
 

jkl 
 
यावेळी प्रवीण वखरे यांनी समाज घडवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक विषय शंभर वर्षात हाती घेतले. भाषा, भूषा, भवन, भजन, भोजन, भ्रमण ही परिवाराची गरज आहे. स्वदेशी ही भारताची आर्थिक प्रगतीसाठी गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदू एकतेवरही मार्गदर्शन केले.
 
 
संत सयाजी महाराज यांनी विविधतेतून हिंदू एकता, समरसता, हिंदू एकतेतून एक संघटनात्मक हिंदूराष्ट्र सर्वोतपरी जीवन समर्पित हिन्दू म्हणजे भारत माता असे प्रतिपादीत केले. संत सयाजी महाराज यांचे स्वागत जुगल पालीवाल यांनी केले तर प्रवीण वखरे यांचे स्वागत वासुदेव पुसम यांनी केले. संत काळे महाराज संस्थेचे अध्यक्ष भास्कर वाढई याचे स्वागत मोरेश्वर पूरी यांनी केले प्रास्ताविक रा. स्व. संघ गोसेवा जिल्हा संयोजक संजय पोहेकर यांनी केले. कार्यक्रमापूर्वी सकाळी गावात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत खरांगणा मोरांगणा मंडळातील विविध गावातील भजन मंडळी व हजारो हिंदू सहभागी झाले होते.
 
 
यशस्वीतेकरिता तालुका संघ चालक रमेश नागोसे, भारतीय विचार मंचचे जिल्हा संयोजक धर्मेंद्र मुंदडा, अमर पोहेकर, गजानन मूळे, वैभव दांडेकर, स्वप्नील सावरकर, दीपक पुरी, विनोद दांडेकर, दलचंद तिवारी, विजय पुसदकर, नीलिमा अक्कलवार, पवन सावरकर, कृष्णा क्षीरसागर, पवन सावरकर, राजू राठी यांनी प्रयत्न केले.
Powered By Sangraha 9.0