पनवेल–कर्जत मार्ग लवकरच खुला

01 Mar 2026 12:06:52
मुंबई,
Mumbai Railway Vikas Corporation मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने Mumbai Railway Vikas Corporation सुरू केलेल्या पनवेल–कर्जत या नवीन दुहेरी उपनगरी रेल्वे मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. येत्या पावसाळ्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे, ज्यामुळे मुंबई उपनगरी रेल्वेचा एकूण विस्तार आता ४०८ किमीपर्यंत पोहोचणार आहे.
 

Mumbai Railway Vikas Corporation 
सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कर्जत प्रवास करण्यासाठी केवळ कल्याणमार्गे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, नवीन मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवाशांना पनवेलमार्गे कर्जतला थेट आणि जलद प्रवास करण्याची सुविधा मिळेल. या मार्गावर पनवेल, चिखले, पोयंजे (मोहापे), चौक आणि कर्जत या पाच स्थानकांचा समावेश आहे, ज्यामुळे विशेषतः नवी मुंबई आणि कर्जत परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.सध्या या प्रकल्पाचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मार्गावर तीन महत्त्वाचे बोगदे आहेत, त्यापैकी २.६ किमी लांबीचा 'वावरले' बोगदा मुंबई उपनगरी रेल्वेवरील सर्वात लांब बोगदा ठरणार आहे. या बोगद्यांमध्ये पहिल्यांदाच खडीमुक्त रुळांचा वापर करण्यात आला असून Mumbai Railway Vikas Corporation  मजबुतीसाठी काँक्रिटचा आधार देण्यात आला आहे, ज्यामुळे भविष्यातील सुरक्षिततेला गती मिळणार आहे.मुंबई उपनगरातील प्रवाशांसाठी हा नवीन मार्ग प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करेल, तसेच रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढविण्यात मदत करेल, अशी अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0