मनपातर्फे आज सत्कार सोहळा

01 Mar 2026 21:24:48
नागपूर,
Nagpur Municipal Corporation महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सोमवार २ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता सिव्हील लाइन्सच्या मनपा मुख्यालयात नागपूर शहराचे माजी महापौर, माजी उप महापौर यांचा सत्कार येईल. याप्रसंगी महापौर निता ठाकरे, मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल,उपमहापौर लीला हाथीबेड आदींची उपस्थिती राहाणार आहे.
 
 
ngp s
 
Nagpur Municipal Corporation  शहराच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये योगदान देणार्‍या माजी महापौर, माजी उपमहापौर यांच्यासह पद्मश्री डॉ. विलास डांगरे, जनार्दनपंत बोथे, सत्यनारायण नुवाल, दोनवेळा महापौर भूषविलेले राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार व माजी महापौर, उपमहापौर यांचा सत्कार केला जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0