वर्धा,
pankaj-bhoyar : आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट, उमेद, वर्धिनी व क्षीतिज महिला प्रभाग संघाच्या संयुत वतीने पवनार येथील महिला बचतगट भवन येथे उजास ग्रीन पॅड युनिटचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते आज रविवार १ रोजी झाले. या युनिटमध्ये बचतगटातील महिलांना रोजगार तसेच उत्पन्नाचे चांगले साधन उपलब्ध होणार असल्याचे यावेळी पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या महाव्यवस्थापक पुनम पाटकर, पुनम ढोबळे, महिला शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष शितल भोयर, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक निरज नखाते, क्षीतिज प्रभाग संघाच्या अध्यक्ष सीमा ठाकूर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात प्रथमच आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या सहकार्याने महिला बचत गटाच्या माध्यमातून बचतगट भवन येथे पुर्ववापर युत सॅनेटरी पॅड युनिट उभारण्यात आले आहे. या युनिटमुळे प्रभागातील बचत गटातील महिलांना रोजगाराची संधी मिळणार आहे. युनिटमुळे आता बचतभवनचा समावेश उद्योगामध्ये झाला आहे, असे पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले.
राज्यातील महिला बचतगटांना सक्षम करण्यासाठी व त्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उमेद मॉल तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. विदर्भात वर्धा येथे २० कोटी रुपये खर्च करुन उमेद मॉल तयार करण्यात येणार आहे. या मॉलमध्ये उमेदचे सर्व उत्पादन ग्राहकांना मिळणार आहे. यामुळे बचत गटाच्या उत्पादनाला मोठी बाजारपेठ मिळणार आहे. यासाठी बचत गटांनी बाजारातील उत्पादित मालाच्या स्पर्धेत उतरण्यासाठी मालाचे पॅकेजिंग, मार्केटींगवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले.
प्रभाग संघाच्या वतीने तयार करण्यात येणार्या या उजास ग्रीन पॅडची पहिली ऑर्डर महिला शिक्षण संस्थेने द्यावी अशी आशा यावेळी महिला शिक्षण संस्थेकडून व्यत केली. प्रास्ताविक पुनम पाटकर यांनी केेले.