पेट्रोल, डिझेल चोरी प्रकरणी चोरेला अटक

01 Mar 2026 21:07:08
वर्धा, 
petrol-diesel-theft-case : स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने गोपनीय माहितीच्या आधारे कारमधून होत असलेली पेट्रोल व डिझेलची वाहतूक रोखूून ५ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवार २८ रोजी महिलाश्रम परिसरात परिसरात करण्यात आली. या प्रकरणी चोरे याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
 
k
 
 
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक महिलाश्रम परिसरात ठाण मांडून होते. दरम्यान, एम. एच. ३२- ए. एस. ४८४३ या क्रमांकाची कार पेट्रोलपंपकडे येताना दिसली. कार थांबविताच चालक समीर शकील शेख (२२) रा. सेलू आणि रवींद्र चोरे (४५) रा. केळझर यांच्या ताब्यातील कारची पाहणी केली असता २८० लिटर पेट्रोल आणि १२० लिटर डिझेल आढळले. पोलिसांनी कार, डिझेल, पेट्रोल, मोबाईल, असा ५ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
 
केळझर परिसरातील ढाब्यावर टँकर चालकाकडून कमी दरात पेट्रोल व डिझेलची खरेदी करून विक्री करीत असल्याचे चौकशीदरम्यान पुढे आले. तक्रारीवरून पोलिसांनी रवींद्र चोरे, समीर शकील शेख यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
Powered By Sangraha 9.0