साहूर येथे धुलिवंदनाला काव्यसंग्रह व ग्रंथ प्रकाशन विविध स्पर्धेत रंगणार शेकडो

01 Mar 2026 21:12:10
प्रकाश वाघ
साहूर, 
sahur-dhuli-vandana : टीव्ही, चित्रपटात बघून आज खरी संस्कृती बाजूला ठेवत गोपी कृष्णाच्या नावे सर्वत्र होळी शिमगा धुलीवंदनचा धिंगाणा सुरू आहे. भावी पिढीचा विचार न करता व्यसनाधीन तरुण आई-बापांना खांदा द्यावा तर बापाच्याच खांद्यावर स्मशानात जात आहेत. हे बघून श्रीक्षेत्र साहूर येथे १५ वर्षांपासून गुरुकुंज आश्रमचे आजीवन प्रचारक रमेशचंद्र सरोदे यांनी आदर्श धुलिवंदन सोहळा सुरू केला आहे. यावेळी काव्यसंग्रह व ग्रंथ प्रकाशन, चित्रकला स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आहे.
 
 
 
jlk
 
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या २३ व्या अध्यायात आदर्श होळी आणि शिमगा कसा करावा सांगितले आहे. परंतु, व्यसनाधीन लोकांनी या सण उत्सवाला विचित्र स्वरूप दिले आहे. त्यातुन सुटका करण्यासाठी बालकांवर सु-संस्कार करण्याच्या दृष्टीने धुळवळीला वेशभूषा, गीत गायन, भाषण स्पर्धा व कराओके गायन तसेच उमादीदी पैठणकर यांच्या तुफान विनोदी भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. निनाद काव्यसंग्रहाचे प्रकाशन व लढा विद्यापीठ नामकरणाचा या ग्रंथाचे विमोचन होणार असल्याने गावात ज्ञानाचे रंग उधळल्या जाणार आहेत.
 
 
श्रीक्षेत्र साहूर येथे आजवर विविध स्पर्धा परीक्षेत पास झालेले किंवा संरक्षण दलात गेलेल्या अनेक गुणवंतांचा व ज्येष्ठ समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला आहे. ३ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा, गीत गायन, भाषण स्पर्धा व कराओके गायन तसेच उमादीदी पैठणकर यांच्या तुफान विनोदी भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याप्रसंगी कृष्णा हरले यांच्या निनाद काव्यसंग्रहाचे प्रकाशन व रमेशचंद्र सरोदे यांच्या लढा विद्यापीठ नामकरणाचा या ग्रंथाचे विमोचन जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांचे हस्ते होणार आहे. अ. भा. श्रीगुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज आश्रमचे राष्ट्रीय वते अ‍ॅड. दिलीप कोहळे, अमोल सोटे, नागपूरचे नायब तहसीलदार किशोर शेंडे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार रेखा शेंडे, अ‍ॅड. अश्विनी कोहळे, अ‍ॅड. अश्विनी गायकवाड, दीपक खरडे, गजानन सरोदे, वसंत ढवळे, ईश्वर वरकड, भाजपाजे ज्येष्ठ नेते उत्तम करांगळे, प्रशांत काकपुरे, प्रभाकर बोंदरे, सरपंच प्रकाश गायकवाड, सरपंच विनोद सोनोने, उपसरपंच रिता ढवळे, चंद्रकला ठाकरे, माजी सरपंच मनोहर बिजवे, आदी उपस्थित राहणार आहेत.
Powered By Sangraha 9.0