समर्थ भारत अभियान स्पर्धेचा बक्षीस समारंभ

01 Mar 2026 14:44:51
नागपूर,
Smart India Campaign समर्थ भारत अभियान अंतर्गत नागपूर विभागीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आमदार निवास येथील व्हीआयपी सभागृहात पार पडला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, भाजपा नागपूर महानगर अध्यक्ष दया शंकर तिवारी होते. त्यांनी लहानपणी पाठांतराचे फायदे स्पष्ट करत पुढील पिढी घडविण्यासाठी पालक व शिक्षकांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित केली.

pusad 
 
 
प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध समुपदेशक डॉ. नितीन विघ्ने यांनी लहान वयातील मेंदूची कार्यक्षमता व त्याचा भविष्यातील परिणाम यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच निवृत्त सह-दुय्यम निबंधक अरविंद पाटील यांनी बालसंस्कारांचे महत्त्व स्पष्ट केले, तर निवृत्त शिक्षिका शीला अगस्ती यांनी मनाचे श्लोक पाठांतराचे उपयुक्तत्व सांगितले.कार्यक्रमाला सुमारे दीडशे विद्यार्थी, विविध शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक व पालक उपस्थित होते.Smart India Campaign विजयी स्पर्धकांना मेडल व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वाधिक विद्यार्थी सहभागी करून घेतल्याबद्दल बी. आर. मुंडले स्कूल यांना विशेष पारितोषिक प्रदान करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशांत धर्माधिकारी व डॉ. प्रज्ञा पुसदकर यांनी विशेष परिश्रम घेतले. संचालन पद्मश्री माहुरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत धर्माधिकारी यांनी केले.
सौजन्य:डॉ. प्रज्ञा पुसदकर,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0