विद्यार्थ्यांनी साजरा केला मराठी गौरव दिन

01 Mar 2026 18:31:59
नागपूर,
Marathi Pride Day मेजर हेमंत जकाते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड कॉमर्स, नागपूर येथे मराठी भाषा गौरव दिन आणि कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.
 
Marathi Pride Day
 
कार्यक्रमात मनिषा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मधुसूदन मुडे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिला मुडे, उपमुख्याध्यापिका भारती मानकर, सुधा नासरे, पल्लवी लाडे आणि शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या जीवनावर आधारित भाषणे आणि त्यांच्या कविता सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. Marathi Pride Day मान्यवरांनी मराठी भाषा आणि कुसुमाग्रज यांच्या जीवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन रोहिणी गजभे यांनी केले.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0