स्वच्छता मोहीमेत स्वयंसेवकांनी संकलित केला ७६८ किलो कचरा

01 Mar 2026 21:08:04
नागपूर,
 
 
radhye-mangalam
 
'Swachchata Mission' मनपाच्या स्वच्छता अभियानात आता नगरसेविकांच्या काही खाजगी संस्था सुध्दा पुढाकार घेत आहे. वॉड क्र.३७ च्या नगरसेविका निधी तेलगोटे यांच्या नेतृत्वात राधे मंगलम सेलिब्रेशन हॉल समोरील मैदान परिसरात स्वच्छता मोहीम घेण्यात आली. कोणताही गाजावाजा न करता ६३ स्वयंसेवकांनी ७६८ किलो कचरा संकलित करीत स्वच्छता मोहीम यशस्वी केली. नागपूर शहराला स्वच्छ सुंदर करण्यासाठी प्रत्येकांनी आपआपल्या परिसरात मोहीम हाती घेतल्यास नागपूर शहर अधिक स्वच्छ व सुंदर होईल, असा विश्वास निधी तेलगोटे यांनी व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0