स्फोटाचा आवाज आणि भयानक परिस्थिती; दुबईमध्ये अडकली पीव्ही सिंधू, VIDEO

01 Mar 2026 15:30:32
अबुदाबी, 
pv-sindhu-stuck-in-dubai भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने दुबईमध्ये अडकून पडल्याच्या पार्श्वभूमीवर एक चित्रफीत प्रसिद्ध करून तेथील परिस्थितीची माहिती दिली आहे. ती बंगळुरूहून ब्रिटनमधील बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपसाठी स्पर्धेसाठी रवाना झाली होती. मात्र दुबई येथे विमान उतरल्यावर अचानक परिस्थिती बिघडली आणि हवाई मार्ग बंद करण्यात आला.
 
pv-sindhu-stuck-in-dubai
 
चित्रफितीत सिंधूने सांगितले की, तिच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करणाऱ्यांचे ती आभार मानते. दुबईत विमान उतरल्यानंतर काही तास अत्यंत तणावपूर्ण गेले. आकाशात अडवण्यात येणाऱ्या हालचालींचे आवाज ऐकू येत होते आणि काही वेळातच त्यांच्या निवासस्थानी अगदी जवळ मोठा स्फोट झाला. pv-sindhu-stuck-in-dubai या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला. सिंधूने पुढे सांगितले की, हा स्फोट तिच्या प्रशिक्षकांच्या अगदी जवळ झाला होता. ते त्या ठिकाणापासून शंभर मीटर अंतरावर होते आणि त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे लागले. इतक्या जवळ घडलेली अशी घटना मन हादरवून टाकणारी असते, असे ती म्हणाली. अशा प्रसंगाची कल्पनाही कोणी करत नाही; मात्र अनेकदा परिस्थिती आपल्या हातात नसते, असेही तिने नमूद केले. संपूर्ण संघाने धैर्य राखत एकमेकांना साथ दिली आणि संकटसमयी शांतता राखली, याबद्दल तिने समाधान व्यक्त केले.
हवाई मार्ग बंद झाल्याने अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला असून खेळाडूंच्या प्रवासावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. pv-sindhu-stuck-in-dubai येणाऱ्या स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचे सिंधूचे उद्दिष्ट असले तरी सध्याच्या घडामोडींमुळे अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Powered By Sangraha 9.0