अमेरिका
US Israel Iran conflict, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर आखाती प्रदेशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून त्याचे पडसाद आता मनोरंजन क्षेत्रातही उमटताना दिसत आहेत. वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी हवाई वाहतूक तात्पुरती स्थगित केली आहे. या गोंधळात बॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका सोनल चौहान दुबई विमानतळावर अडकली असल्याची माहिती समोर आली आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीचे आवाहन केले आहे.
इराणने प्रत्युत्तरादाखल आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम दुबईसह संपूर्ण परिसरावर झाला असून सुरक्षेच्या कारणास्तव दुबई इंटरनॅशनल विमानतळ आणि Al Maktoum International Airport अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील सर्व उड्डाणे अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहेत. जगातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ Dubai International Airport वरील अचानक बंदमुळे हजारो प्रवासी अडकले असून त्यात सोनल चौहानचाही समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर सोनलने आपल्या ‘एक्स’ (माजी ट्विटर) खात्यावरून भावनिक पोस्ट शेअर केली. “आदरणीय पंतप्रधान मोदी, सध्या सुरू असलेल्या संकटामुळे मी दुबईमध्ये अडकली आहे. विमाने रद्द करण्यात आली आहेत आणि भारतात परतण्याचा कोणताही स्पष्ट मार्ग नाही. सुरक्षित परतीसाठी सरकारकडून मार्गदर्शन आणि मदतीची विनंती आहे,” असे तिने लिहिले आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून चाहत्यांकडून तिच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना व्यक्त केल्या जात आहेत.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय तणावाचा US Israel Iran conflict, फटका मनोरंजन उद्योगालाही बसताना दिसत आहे. अनेक चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आणि प्रमोशनल उपक्रम अनिश्चिततेत सापडले आहेत. रणबीर कपूरच्या आगामी Ramayana चित्रपटाचा ट्रेलर लवकरच San Diego Comic-Con येथे प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. मात्र सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे अशा कार्यक्रमांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच ‘The Kerala Story 2’ या चित्रपटाच्या कमाईविषयीही चर्चा सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय अस्थिरतेमुळे परदेशातील प्रदर्शनांवर परिणाम होऊ शकतो, असे चित्रपट व्यापार विश्लेषकांचे मत आहे.सोनल चौहानने २००८ साली प्रदर्शित झालेल्या Jannat या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत होते. पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आणि ‘जन्नत गर्ल’ म्हणून ओळख मिळवली. अभिनयासोबतच ती गायन क्षेत्रातही सक्रिय असून विविध चित्रपटांत तिने आपला आवाज दिला आहे.हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त सोनलने दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतही काम केले आहे. अलीकडेच ती प्रभास अभिनीत Adipurush तसेच नागार्जुनसोबतच्या The Ghost या चित्रपटांत झळकली होती. त्यामुळे देशभरात तिची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे.
सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत भारतीय दूतावास आणि संबंधित यंत्रणा अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत हवाई वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सोनल चौहानसह दुबईत अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.