भारताची शक्तीची चीनलाही जाणीव

10 Mar 2026 09:29:29
वेध
चंद्रकांत लोहाणा
indias power आपल्या विस्तारवादी मानसिकतेसाठी चीनची संपूर्ण जगाला ओळख आहे. गरीब आणि असहायतेचा फायदा घेऊन चीनने अनेक देशांना आपल्या जाळ्यामध्ये ओढले आहे. त्यामुळे संपूर्ण जगामध्ये कटकारस्थान करून आपला स्वार्थ साधणारा देश म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. याबाबत भारत अतिशय सावधगिरीने पावले उचलून वाटचाल करीत असला, तरीही भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या घडामोडींबाबबत डोळ्यात तेल घालून दक्ष राहण्याची गरज आहे. 2014 नंतर उदयास आलेल्या नव्या भारताची ओळख चीनला नक्कीच झाली आहे. त्यामुळे ताकही फुंकून पिण्याच्या मानसिकतेमध्ये सध्या चीन वावरत आहे. 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर 2014 पर्यंत चीन भारतावर सतत कुरघोडी करीत राहिला. येथील सत्ताधारी हे सर्व आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत राहिले. काँग्रेस पक्षाने अनेकदा देशहित बाजूला सारून आपल्या वैयक्तिक गरजांना प्राधान्य दिले. परंतु, डोकलाम आणि गलवान घाटीच्या घटनेने चीनला नरेंद्र मोदीच्या नव्या भारताची खरी ओळख झाली. आकाशालाही गवसणी घालण्याची ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आव्हानांना सामोरे जात निर्माण केली.
 
 

china 
 
 
 
भारतीय संस्कृती आणि परंपरेची यावेळी खऱ्या अर्थाने जगाला ओळख झाली. त्यामुळे शक्तिशाली भारतसोबत मैत्रीचे नवे पर्व सुरू व्हावे यासाठी चीनने आटापिटा सुरू केला आहे. भारत आणि चीनने एकमेकांकडे प्रतिस्पर्धी नव्हे, तर भागीदार आणि धोक्याऐवजी संधी म्हणून बघितले पाहिजे, असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांचे वक्तव्य म्हणजे संपूर्ण जगाला नव्या शक्तिशाली भारताची ओळख करून देणारे आहे. एका शक्तिशाली आणि शक्तिसंपन्न शेजारी देशाशी पूर्वीची सर्व कटुता विसरून भागीदार म्हणून जर चीन भारताकडे बघत असेल, तर चीनलाही भारताच्या शक्तीची, स्वाभिमानाची ओळख पटली आहे, हे दिसून येते.
या देशावर जवळपास 60 वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेस पक्षाने देशाला शक्तिसंपन्न करण्याऐवजी घराणेशाहीच्या संपन्नतेलाच अधिक महत्त्व दिले. काँग्रेसच्या या माानसिकतेची जबर किंमत देशाला मोजावी लागली. त्याचे चटके अजूनही आम्हाला बसत आहेत. काँग्रेस पक्षाने लाडावून ठेवलेला पाकिस्तान एका झटक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरळ केला. हाती कटोरा घेऊन जगभर फिरण्यास त्याला बाध्य केले. संपूर्ण जगाला त्यांनी खèया भारताची ओळख करून दिली. अमेरिका आणि चीन हे दोन देश नेहमीच एकमेकांना पाण्यात बघणारे. त्यामुळे शक्तिशाली भारत आपला मित्र असावा असे चीनला वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, पाठीमध्ये खंजीर खुपसण्याची चीनची वृत्तीही आम्ही कायम स्मरणात ठेवली पाहिजे. चीनचे विस्तारवादी धोरण हे शेजारी राष्ट्राच्या जमिनीवर दावा करणे, लष्करी ताकद वाढविणे आणि त्या देशास आपल्या आर्थिक जाळ्यामध्ये ओढून त्यांचा भूभाग काबीज करणे यावरच आधारित आहे. चीनने केवळ भारताचाच नव्हे तर आपल्या जवळच्या जवळपास 23 देशांच्या भूभागावर दावा केला आहे. नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, मालदीव यासारख्या अनेक लहान देशांना भरमसाट कर्ज देऊन चीनने या देशांना आपले बटिक बनविले आहे. त्यामुळे भविष्यामध्ये चीनचा या देशाशी व्यवहार कसा असेल, हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. चीनचा हा कावेबाजपणा जगानेही ओखला आहे. दुसरीकडे भारताने कोणत्याही अन्य देशाचा भूभाग बळकावण्याचा प्रयत्न तर दूर तसा साधा विचारही कधी केला नाही.indias power हे विश्वचि माझे घर अशा उदात्त वृत्तीचे भारतीय आम्ही. त्यास अधिक ठळकपणे नरेंद्र मोंदींनी जगासमोर मांडले आहे. संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी झटणारा भारत अशी ठाम ओळख मोंदींनी जगामध्ये निर्माण केली आहे. त्यामुळे जगामधील कितीतरी देश भातरामध्ये आपले भविष्य शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. नरेंद्र मोदींची घोडदौड अशीच सुरू राहिली तर आपले काही खरे नाही, या नैराश्याने काँग्रेस ग्रासली असून, काँग्रेस बेताल आणि भयभीत झाली आहे. भारताच्या बदनामीचे षडयंत्र रचण्यात काँग्रेस आपला वेळ घालवीत आहे. विदेशामध्येही आपल्या देशाची बदनामी करीत आहे. शत्रू घरामधील असो की, बाहेरचा नरेंद्र मोदी हे चांगलेच ओळखून आहे.
9881717856
Powered By Sangraha 9.0