नागपूर,
esic medical college केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या कर्मचारी राज्य विमा निगमची बैठकीत 27 जून 2025 रोजी नागपूर व पुण्यासह देशात 10 नवीन मेडिकल कॉलेजचा निर्णय झाला. पण, नागपूरचा प्रस्ताव अद्याप शासनाला सादर झाला नसल्याची खंत व्यक्त करीत त्यास विलंब का, असा आक्रमक सवाल आ. प्रवीण दटके यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नातूनकेला.
हा प्रस्ताव पाठवल्यास एमबीबीएसच्या जागा वाढणार असून मेडिकल-मेयोसोबतच कामगार रुग्णालय मेडिकल कॉलेजच्या रूपात तिसरे मेडिकल कॉलेज नागपुरात तयार होईल, असे दटके म्हणाले.
नागपुरात नवे नागपूर व मिहान या माध्यमातून मोठी कामगार वसाहत निर्माण होत आहे, त्यांना या माध्यमातून लाभ होईल. रोजगार निर्मिती होणार आहे. हनुमाननगरातील कामगार विमा रुग्णालयाच्या सध्याच्या 3 एकर जागेत फक्त ओपीडी होते. नवीन मेडिकल कॉलेज झाल्यास मोठ्या प्रमाणात कामगार रुग्णांना लाभ होईल.
राज्य कामगार विमा महामंडळाचे वैद्यकीय महाविद्यालय नागपुरात स्थापित करण्याबाबत सामंजस्य करार कधी केला ? त्याची सद्यस्थिती काय आहे ?, कामगार विभागाची स्वतःची, आरोग्य विभागाकडे जागा असताना प्रस्ताव पाठवण्यासाठी विलंबाची कारणे काय, राज्यात किती कामगार हॉस्पिटल आहेत, त्यात पुरेशी यंत्रणा, वैद्यकीय उपकरणे आहेत का, ती चालू स्थितीत आहेत का, कर्मचारी कायमस्वरूपी आहेत का, कामगार विमा महामंडळाचे मेडिकल कॉलेज कधी कार्यान्वित करणार असे नेमके प्रश्न आ. दटकेंनी विचारले.
आ. विकास ठाकरे यांनी विमा रुग्णालयातील अपुèया व अयोग्य सुविधांचा मुद्दा उपस्थित केला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विमा रुग्णालय मेडिकल कॉलेज स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. प्रस्ताव पाठवण्यापूर्वी तांत्रिक त्रुटी दूर करून प्रस्ताव नव्याने केंद्र सरकारला पाठवू, असे आश्वासित केले.