वाघदा येथे शेतकरी जखमी, जळगावात घरे जळून खाक

10 Mar 2026 15:53:55
आर्वी, १० मार्च
houses burnt down तालुक्यातील विविध गावांमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघदा येथे शेतकरी जखमी तर जळगावात घरे जळून खाक झाली. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच शेतकर्‍यांना या आगीच्या घटनांमुळे आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
 

वाघादा जाळून  
 
वाघदा येथे शेतकरी रंजित झोटिंग यांच्या गोठ्याला अचानक आग लागली. या आगीत गोठ्यात ठेवलेला कापूस, इंजिन, स्प्रिंकलर सेट तसेच शेतीसाठी लागणारी इतर साहित्य जळून खाक झाली. आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असताना स्वतःचा गोठा वाचवण्यासाठी गेलेले रंजित झोटिंग हेही भाजले गेले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, जळगाव येथेही आग लागून मोठे नुकसान झाले आहे. गावातील पुरुषोत्तम पंढराम यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले असून घरातील सर्व साहित्य आगीत नष्ट झाले आहे. तसेच गावातीलच उषा भलावी यांच्या घराचा काही भाग देखील आगीत पूर्णपणे जळून खाक झाला आहे.houses burnt down या सलग आगीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यत होत असून प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0