देवळीत गौर पौर्णिमा; भक्ती, संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय एकात्मतेचा संगम

हरे कृष्ण महामंत्राचा गजर

    दिनांक :10-Mar-2026
Total Views |
देवळी,
gaur-purnima in deoli आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन देवळी यांच्या वतीने ६ रोजी गौर पौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थापक आचार्य कृष्णकृपा मूर्ती ए. सी. भतिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे कृपापात्र शिष्य लोकनाथ स्वामी यांच्या प्रेरणेने हा उत्सव भतिमय वातावरणात पार पडला. उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे रशियातून आलेल्या महिला व पुरुष भतांची उपस्थिती. त्यांच्या सहभागामुळे संपूर्ण शहरात भतिमय वातावरण निर्माण झाले. नगर परिक्रमा दरम्यान रशियन भतांनी हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनावर टाळ-मृदुंगाच्या तालावर नृत्य करत भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण केले.
 
 

गौरी पौर्णिमा  
 
 
याप्रसंगी देवळीचे नगराध्यक्ष किरण ठाकरे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून रशियन भतांचे स्वागत करण्यात आले. श्रीराम मंदिरात गौर नीताई कृष्ण-बलराम यांच्या विग्रहांचा पुष्पाभिषेक करण्यात आला. याप्रसंगी महापुरुष प्रभू रत्नागिरी यांनी साध्या व सोप्या भाषेत प्रवचन करताना श्रीकृष्णभतीचे महत्त्व विषद केले. श्रीकृष्ण यांच्या सेवकांची सेवा करणे हे श्रीकृष्णांची सेवा करण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे असे सांगत अध्यात्म, संस्कृती आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या प्रवचनाने उपस्थित भाविक भारावून गेले.
 
शहरातील ठाकरे चौकात रशियन भतांचे पारंपरिक भारतीय पद्धतीने स्वागत करण्यात आले. संस्कृती, भाषा व देश वेगळे असले तरी भतिभाव सर्वांना एकत्र जोडतो, याची प्रचिती यावेळी आली.gaur-purnima in deoli स्थानिकांनी रशियन भाषेत स्वागत केल्याने पाहुण्यांच्या चेहर्‍यावर आनंदाचे भाव उमटले. कार्यक्रमाची सांगता आरती व महाप्रसादाने करण्यात आली.
यशस्वी आयोजनासाठी अकिंचन कृष्ण प्रभू, सुदामा विप्र प्रभू, राम मंदिराचे पुजारी अंबुलकर महाराज, ट्रस्टी सचिन वैद्य, दादाराव मून, धनराज घुबडे, लालू टावरी, भोला जाधव, सुदर्शन पवार, योगेश जाधव, पवन मुडे, अथर्व मुडे, गजीराम शिंदे, गौरव प्रभू, अभिजीत प्रभू, जयापात्रा प्रभू, तसेच मोंटू राम उत्कल समाज जगन्नाथ रथयात्रा व्यवस्थापक, वर्धा यांच्यासह इस्कॉन परिवारातील सदस्यांनी सहकार्य केले.