देवळीची कन्या पूर्वा भोयर महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघाची कर्णधार

    दिनांक :10-Mar-2026
Total Views |
देवळी,
purva bhoyar शहरातील क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी पूर्वा (मानसी) विजय भोयर हिने केली आहे. १७ ते २१ मार्च २०२६ दरम्यान भुवनेश्वर (ओडिसा) येथे होणार्‍या २१ वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी पूर्वा भोयर हिची निवड करण्यात आली आहे.
 

purva bhoyar 
 
पूर्वा भोयर ही उत्कृष्ट खेळाडू असून तिने विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली छाप उमटवली आहे. तिच्या सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिला महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. तिच्या निवडीमुळे देवळी शहरासह संपूर्ण वर्धा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून क्रीडा प्रेमी, मित्रपरिवार व नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.purva bhoyar तसेच आगामी राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्र संघाला उत्तम नेतृत्व देऊन राज्याचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यत केला जात आहे.