नागपूर,
Tehsil Nagpur तहसील नागपूर ग्रामीण मंडळ हुडकेश्वर अंतर्गत हरिश्चंद्र येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व समाधान शिबिर संपन्न झाले. शिबिरात परिसरातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि वृद्ध मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शिबिरात नागरिकांच्या विविध अडचणी समजून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. तसेच उत्पन्न, रहिवासी, पट्टेवाटप, ई-मोजणी, फेरफार, आधार, सातबारा इत्यादी महसुली प्रमाणपत्रांसाठी आवेदनपत्र भरले गेले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण मिहिरे, नागपूर विभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार स्वप्नील काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रुपराव शिंगणे, नगराध्यक्ष अजय बोंढारे, सरपंच प्रीती इंगळे, उपसरपंच कविता ठाकरे, संजय गांधी समितीचे अध्यक्ष सचिन घोडे, Tehsil Nagpur नायब तहसीलदार सचिन शिंदे, मंडळ अधिकारी रवींद्र गायगोले, भूपेंद्र कापटे, ग्राम महसूल अधिकारी प्रियांका राऊत, विशाल कडू, राजेश तळोकर यांच्यासह आरोग्य, सेतू, निवडणूक, महावितरण व पुरवठा यांसह विविध विभागांनी सक्रिय सहभाग घेतला. या शिबिरादरम्यान गट ग्रामपंचायतकडून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी समाधान व्यक्त केले गेले.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र