भाजपा महिला आघाडीचा उपक्रम:सहकारी संस्थांच्या माध्यमातून महिलांना करणार सक्षम

11 Mar 2026 21:36:10
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
bjp-womens-front-initiative : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या संकल्पनेनुसार भाजपा जिल्हा कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व सहकार विदर्भच्या संयोजक लता गावंडे आणि शुभदा नाईक यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ व पुसद जिल्हा संयोजक माया शेरे यांनी सर्व सहकारी संस्थांच्या पदाधिकाèयांचा आढावा बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आला.
 

bjp-womens-front-initiative 
 
 
 
यावेळी माया शेरे आणि भाजपा जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान यांना सांगितले की, लवकरात लवकर आमच्या महिलांना सक्षम करण्याची खरी गरज आहे. त्यावेळी त्यांनी महिलांना सांगितले की, सर्व महिलांच्या हाताला काम देण्याचे प्रयत्न आम्ही करीत आहोत.
यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शैला मिर्झापुरे यांनी सहकारी संस्थांमध्ये त्वरित कामे सुरू करू असे आश्वासन दिले. लता गावंडे यांनी संस्थेच्या ऑडिटबद्दल विचारून पॅनकार्ड सर्वांनी काढले का, याबद्दल विचारून खूप छान माहिती दिली. शुभदा नायक यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.
 
 
यावेळी यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांनी सांगितले की, सहकार क्षेत्रात होईल तशी मदत करण्याचा मी प्रयत्न करेन. यावेळी मंचावर उपस्थित भाजपा महिला आघाडी प्रदेश महामंत्री रेखा कोठेकर, जिल्हाध्यक्ष शैला मिर्झापुरे, जिल्हा महामंत्री निर्मला विणकरे, शहर अध्यक्ष लक्ष्मी सातपुते, पुष्पलता सप्रे, अंजली उत्तरवार, मीनल पांडे, प्रांजली राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी व सहकार आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
Powered By Sangraha 9.0