कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; खुनाची शक्यता

- खैरी परीसरातील घटना

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर,
body-found-in-decomposed : नवीन कामठी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत येणाèया खैरी शिवार परिसरात बुधवारी एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. मात्र, मृत व्यक्तीवर चाकूने वार केल्याच्या खुना आणि मृतदेहाजवळ दारुच्या बाटल्या पडलेल्या आहेत. त्यामुळे हा खूनाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
 
 
 
LK
 
 
 
पाेलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-कामठी मार्गावरील खैरी शिवारातील निर्जन भागातून काही नागरिकांना तीव्र दुर्गंधी येत हाेता. परिसरात शाेध घेतला असता नाल्याजवळ एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला दिसून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने पाेलिसांना माहिती देण्यात आली. नवीन कामठी पाेलिसांनी घटनास्थळी पाेहाेचून पाहणी केली असता मृतदेहाजवळ दारूच्या रिकाम्या बाटल्या तसेच सिगारेटची पाकिटे आढळून आली. तसेच मृत व्यक्तीच्या पाेटावर खाेल जखमा दिसून आल्या असून परिसरात रक्ताचे डागही आढळल्याने हा प्रकार खुनाचा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
 
मात्र, अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. प्राथमिक तपासात एखाद्या वादातून या व्यक्तीची हत्या करून आराेपींनी मृतदेह त्या ठिकाणी टाकून पळ काढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद करून आसपासच्या भागातील बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट हाेणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले. सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.