भुलाई-भांडेगाव टोलनाका तत्काळ बंद करा

महाविकास आघाडीकडून टोलनाक्याची तोडफोड

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
bhulai-bhandegaon-toll-booth : कारंजा मार्गावरील भुलाई ते भांडेगाव दरम्यान सुरू करण्यात आलेला टोलनाका तत्काळ बंद करण्यात यावा. त्यामुळे स्थानिक नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. दारव्हा कारंजा मार्गाची सध्याची दुर्दशा पाहता येथे टोल वसुली करणे योग्य नसल्याचे काँग्रेसचे मत आहे. या टोलनाक्यामुळे कारंजा व दारव्हा बाजारपेठेत दैनंदिन ये-जा करणारे शेतकरी, व्यापारी, शेतमाल वाहतूकदार, तसेच शिक्षणासाठी प्रवास करणारे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना विनाकारण अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप आहे.
 
 
y11March-Toll-Naka
 
त्यामुळे हा टोलनाका कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने टोलनाक्याची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. या आंदोलनात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे, दारव्हा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रकाश नवरंगे, उबाठा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजय गाडगे, तालुका प्रमुख संतोष ठाकरे, दारव्हा नगर परिषद गटनेता सय्यद फारूख, माजी शिक्षण सभापती ज्ञानेश्वर बोरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ सिंह, उबाठा शिवसेना शहरप्रमुख अमोल दुधे, पंढरीनाथ सिंहे, अतुल राऊत, सरफराज खान, गजानन बिबेकर, अजीम शहा, ज्ञानेश्वर खोडे यांचा प्रमुख सहभाग होता.