गोवंश मांस कटाई करणाऱ्यांस पोलिसांनी घेतले ताब्यात

11 Mar 2026 18:23:46
तभा वृत्तसेवा
पुसद,
cow slaughter case Pusad, ठाणेदार पो.नि. सेवानंद वानखडे, स.पो.नि प्रेमकुमार केदार हे त्यांचे पोलीस स्टाफ शेणी पोउपनि रमेश ईगळे , पोकों अमित पाटील, पोकॉ आकाश बाभुळकर, पोहवा मनोज कदम यांच्यासह पोलिसठाणे हद्दीत 8 मार्च रोजी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, मोहंमद आसिफ मोहंमद तयब कुरेशी (वय 44, गढीवार्ड) हा घरासमोरील अंगणात गोवंशाचे मास कटई करीत असल्याच्या माहितीवरून दोन पंच व पोस्टाफसह वरील नमूद ईसमाच्या घराचे समोरील अंगणात गेले. तेथे एकजण सुरीने गोवंशाचे मांस कटाई करीत असताना आढळला. पंचासमक्ष त्याचे नाव मोहंमद आसिफ मोहंमद तयब कुरेशी (वय 44, गढीवार्ड) असे सांगितले.
 

cow slaughter case Pusad, 
तेव्हा आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. सुशिल शंकर चव्हाण पशुवैद्यकिय अधिकारी लघू पशू चिकित्सालय पुसद मासाची तपासणी केली. आरोपी मोहंमद आसिफ मोहंमद तयब कुरेशी (वय 44, गढीवार्ड) यांच्याकडुन एक सुरी जुनी वापरली, प्रथमदर्शनी गोवंश मांस वजन अंदाजे 70 किलो जप्त करण्यात आले. आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम 1976 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपअधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बि.जे. यांच्या मार्गदर्शनात पोलिस ठाणे पुसद (शहर) ठाणेदार पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या नेतृत्वात त्यांचे अधिनस्त पोलिस पथकाने केली असून गुन्ह्याचा पुढील तपास मनीषा वाघमारे, प्रशांत स्थूल करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0