महिलांच्या कायदेशीर तरतुदींची माहिती ठेवा

डीसीपी एन. रश्मिता राव: महिला सत्कार व जनजागृती साेहळा

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
dcp-n-rashmita-rao : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नागपूर पाेलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ क्रमांक चारने एका विशेष सत्कार आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाèया महिला पाेलिस अंमलदार आणि हाॅटेलमधील महिला कर्मचाèयांचा गाैरव करण्यात आला.
 
 
K
 
परिमंडळ क्रमांक 4 च्या पाेलिस उपायुक्त रश्मिता राव यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम बुधवारी पार पडला. यामध्ये परिमंडळ क्रमांक 4 अंतर्गत येणाèया सहा पाेलिस ठाण्यांमधील दुर्गा मार्शल म्हणून उत्कृष्ट कर्तव्य बजावणाèया महिला पाेलिस अंमलदारांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच हाॅटेलमधील महिला कर्मचाèयांच्या कामाचीही दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना पाेलिस उपायुक्त रश्मिता राव यांनी महिलांना त्यांच्या हक्कांची आणि सुरक्षिततेची जाणीव करून दिली.
 
 
त्यांनी महिलांचे कामाच्या ठिकाणी हाेणारे शाेषण, लैंगिक अत्याचार आणि छळ याविराेधात असलेल्या कायदेशीर तरतुदी त्यांनी समजावून सांगितल्या. अशा प्रकारच्या काेणत्याही घटना घडल्यास न घाबरता पाेलिसांकडे तक्रार देऊन कायदेशीर मदत घेण्याचे आवाहन त्यांनी केले. अनाेळखी व्यक्ती आणि समाज माध्यमांद्वारे हाेणाèया फसवणुकीपासून महिलांनी सावध राहणे आणि स्वत:च्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिला पाेलिस अंमलदार आणि हाॅटेल कर्मचाèयांना भेटवस्तू देऊन त्यांना प्राेत्साहन देण्यात आले.