महिला सन्मान व सक्षमीकरण कार्यक्रम साजरा

11 Mar 2026 18:59:23
नागपूर,
Empowerment program भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, दक्षिण-पश्चिम मतदार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त प्रतापनगर येथील जनसंपर्क कार्यालयात महिला सन्मान व सक्षमीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन डॉ. माधुरी इंदुरकर यांनी केले होते, तसेच उद्योजक महिलांचे विविध स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी सुरेल गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला.
 

१ २  
 
 
कार्यक्रमाला महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिलाहातीबेड, सभापती अश्विनी जिचकार व निधी तेलगोटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती फडणवीस यांनी केले.Empowerment program आभार स्वाती माहूरकर यांनी मानले. महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सौजन्य :रुपल दोडके, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0