मारेगाव,
farmers-son-commits-suicide : येथील प्रफुल बंडू आत्राम या 40 वर्षीय युवकाने 9 मार्चला सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या वडिलाच्या नावाने शेती असून तो शेती करायचा. शेतात उत्पन्न कमी झाल्याने आर्थिक विवांचनेत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलिस दाखल होऊन यांनी पंचनामा करून याबाबत दिगंबर किनाके, सागर दीपेवार, नरेंद्र तुमराम अधिक तपास करीत आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता मारेगाव शवविच्छेदनगृहात पाठविण्यात आला. त्याच्यामागे आई, वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.