उपोषणाच्या सातव्या दिवशी काळे फासून आंदोलन

11 Mar 2026 19:56:06
चंद्रपूर, 
bandu-dhotre : जिल्ह्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष, वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू आणि ताडोबाच्या ‘लोहारडोंगरी’ खाण प्रकल्पाविरोधात इको-प्रो संस्थेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे. बुधवार, 11 मार्चला या आंदोलनाला सात दिवस झाले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनालचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वतः काळे फासून आंदोलन केले.
 
 
 
kl;
 
 
 
या आंदोलनात संतोष कुचनकर, धर्मेंद्र लुणावत, योगेश दुधपचारे, आकाश घोडमारे, अब्दुल जावेद, अमित कुमरे, प्रमोद मलिक, विनोद थेरे, बंडू दुधे, बिमल शहा, राजू काहीलकर, राजू हाडगे, सचिन धोतरे, चित्राक्ष धोतरे, अजय नेताम, गौरव कुशमवार, किशोर जामदार सहभागी झाले होते. बुधवारी काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी उपोषण मंडळास भेट दिली. स्थानकवासी जैन समाज, गोंडवाना गणतंत्र पार्टी, जेसीआय चंद्रपूर, अखिल भारतीय जनवादी महिला संघटन, हबिटेट कन्सर्वेशन सोसायटी, जेष्ठ नागरिक संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेशनल असोशिएशन ऑफ इंजीनिअर्स, राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र, गुरुकुल शिक्षा संस्था आदींनी या सत्याग्रहाला समर्थन दिले.
 
लोहारडोंगरी लोहखनिज प्रकल्प विधानसभेत गाजला
 
 
वन्यजीव आणि पर्यावरणासाठी घातक ठरण्याची शक्यता असलेला लोहाडोंगरी लोहखनिज खान प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. त्यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी, या खाण प्रकल्पाला मंजुरी देण्याचा शासनाचा कोणताही मानस नसल्याचे स्पष्ट केले. चंद्रपूर जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या लोहाडोंगरी प्रकल्पाबाबत वाढत असलेल्या पर्यावरणीय आणि सामाजिक चिंतेच्या पृष्ठभूमीवर आ. जोरगेवार यांनी वनविभागाकडे हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती.
Powered By Sangraha 9.0