गॅस निर्मिती करण्याचा शोध कुठे गेला?

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
मुंबई,
Sanjay Raut पश्‍चिम आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचे परिणाम आता थेट महाराष्ट्राच्या उद्योगधंद्यांवर आणि इंधन बाजारावर दिसून येत आहेत. या गंभीर परिस्थितीवर भाष्य करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे. “देशातील इंधन संकट दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाल्यातून गॅस निर्मितीच्या संशोधनाचा आता वापर करण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी म्हटले.
 

Iran-Israel-US conflict impact India, Maharashtra fuel crisis, Sanjay Raut criticism central government, 
आखाती युद्धाच्या सावटाखाली खनिज तेल आणि गॅस वाहतुकीचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेली ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) बंद झाली आहे. यामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला असून, भारतात विशेषतः महाराष्ट्रात ऑटो एलपीजी आणि औद्योगिक गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील औद्योगिक घटती स्थितीबाबत चिंता व्यक्त केली.
सातारा, सांगली आणि Sanjay Raut  कोल्हापूर येथील इंजिनिअरिंग प्लांट्सला गॅसची मोठी गरज असते, परंतु पुरवठा थांबल्यामुळे हे उद्योग संकटात सापडले आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि चाकण (पुणे) येथील ऑटोमोबाईल हबला इंधन टंचाईचा मोठा फटका बसला आहे. या संकटामुळे उद्योगांबरोबरच शेतकरी, कष्टकरी, हॉटेल व्यावसायिक आणि टाईल्स उत्पादकही प्रभावित झाले आहेत.संजय राऊत यांनी म्हटले, “पंतप्रधान मोदी हे एक मोठे संशोधक आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी नाल्यातून गॅस निर्मिती करण्याचा शोध लावला होता. त्या गॅसवर घरातील चुली पेटवता येतात. आता देशावर इंधनाचे संकट असताना मोदींच्या या संशोधनाचा फायदा देशाला व्हायला हवा.”
 
 
याशिवाय त्यांनी सुचवले की, मोदींच्या संकल्पनेतून मुंबईतील मिठी नदीच्या किनाऱ्यावर गॅस निर्मितीचा पहिला प्रकल्प सुरू करावा. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना बोलवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मिठी नदी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर यमुना नदीवरही समान प्रयोग करता येईल, असेही त्यांनी सांगितले.संजय राऊतांनी Sanjay Raut  केंद्र सरकारवर खोचक टीका करत म्हटले, “सध्याच्या परिस्थितीमुळे गाड्या रस्त्यावर धावण्याऐवजी पुन्हा बैलगाड्यांचे युग येईल की काय, अशी भीती वाटते. महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर आहे, पण मोदी आणि त्यांच्या समर्थकांपासून या इंधन टंचाईवर एकही शब्द ऐकायला मिळत नाही.”