जिल्ह्यात महत्त्वाचे आदेश 'या' सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित

11 Mar 2026 12:23:03
सिंधुदुर्ग
LPG cylinder आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आता भारतावरही परिणाम करत आहे. विशेषतः तेल आणि इंधन पुरवठा साखळीवर याचा थेट परिणाम दिसत आहे. दिवसागणिक परिस्थिती अधिक चिघळत असल्याने, महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांनी घरगुती एलपीजी गॅस, पेट्रोल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
 

LPG cylinder  
महत्वाचा आदेश
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) 2023 च्या कलम 163 अन्वये जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार पेट्रोल, पेट्रोलियम उत्पादने तसेच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वाहून नेणारी वाहने अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सर्व महामार्ग, मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांवरून या वाहनांना मुक्त संचाराचा अधिकार देण्यात आला आहे. तसेच इंधनपुरवठा करणाऱ्या वाहनांना आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षण पुरवण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात LPG cylinder देखील परिस्थिती गंभीर असून, व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा सुरु ठेवणाऱ्या हॉस्पिटल्स, वसतिगृह, शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या संस्था, वेदपाठ शाळा, शिक्षण संस्था आणि संरक्षण क्षेत्राला यासाठी अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्जामध्ये महिन्याला किती व्यवसायिक सिलेंडर लागतील याची माहिती स्पष्टपणे मांडावी लागणार आहे. त्यानुसार गॅस एजन्सींना गरजेनुसार निम्मे सिलेंडर देण्याची मुभा मिळणार आहे.अमरावती जिल्ह्यातही एलपीजी गॅस सिलिंडरच्या ऑनलाईन बुकिंगमध्ये तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकांना ऑनलाईन बुकिंगमध्ये क्रमांक उपलब्ध नसल्याचा संदेश येत असल्याचे तक्रारीत दिसून आले आहे. यामुळे अनेक ग्राहक थेट गॅस एजन्सीकडे जाऊन सिलिंडर घेण्यास भाग पाडले जात आहेत. परिणामी, काही ठिकाणी गॅस एजन्सीवर गर्दीही वाढली आहे.सरकारी अधिकारी आणि स्थानिक प्रशासन यावेळी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन करत आहेत. गॅस आणि इंधन पुरवठ्याच्या सुरळीत व्यवस्थेसाठी प्रशासन सतत काम करत आहे, तसेच आवश्यकतेनुसार निर्बंध आणि मार्गदर्शक आदेश अद्ययावत करत आहे.
Powered By Sangraha 9.0